Homeताज्या बातम्याखड्ड्यात पडला, हातावरून ट्रकचं गेलं चाक, २४ दिवस मृत्यूशी झुंज, स्वातंत्र्यदिनी रोहनची...

खड्ड्यात पडला, हातावरून ट्रकचं गेलं चाक, २४ दिवस मृत्यूशी झुंज, स्वातंत्र्यदिनी रोहनची प्राणज्योत मालवली

महाराष्ट्र नामा: Kalyan News : खड्ड्यात पडला, हातावरून ट्रकचं गेलं चाक, २४ दिवस मृत्यूशी झुंज, स्वातंत्र्यदिनी रोहनची प्राणज्योत मालवली
Kalyan Accident : रस्ते अपघातामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अशातच कल्याणमधील एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. खड्ड्यांमुळे एका तरूणाचा बळ गेला आहे. गेले २४ दिवस त्याने मरणाशी झुंज दिली. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र नामा. वृत्तसेवा कल्याण : कल्याणातील २८ वर्षीय तरुणाचा मानपाडा रस्त्यावर खड्ड्यात दुचाकी आदळून २३ ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २४ दिवस त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टराकडून करण्यात आले. मात्र १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.२५ वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर आघात कोसळला आहे. रोहन शिंगरे असे या तरुणाचे नाव आहे.
कल्याणच्या रामबाग परिसरात आई वडिलासमवेत राहणारा रोहन वाशी मधील आय सी आय लोम्बार्ड शाखेत काम करत होता. रोहन नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकी वरून २३ जुलै रोजी कामावर जात असताना कल्याण शिळ मार्गावरील पिंपळेश्वर पॉईट हॉटेलजवळच्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने रोहनचा अपघात झाला. दुचाकीवरून रोहन खाली पडताच त्याचा डावा हात मागून येणाऱ्या ट्रक खाली चिरडला गेला. या ट्रकने त्याला काही मीटर अंतरा पर्यत फरपटत नेले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या रोहनला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेत वडील राजेंद्र यांनी इतरांच्या मदतीने रोहनला सानपाडा येथील महात्मा फुले चरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल केले.

मागील २४ दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्याच्या डाव्या हातात इन्फेक्शन झाल्याने त्याचा डावा हात कापून काढण्यात आला. मात्र तरीही त्यांच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन झाल्याने त्याचे अवयव हळूहळू निकामी होऊ लागले होते. अखेर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.२५ वाजण्याच्या सुमारास रोहन याने अखेरचा श्वास घेतला. रोहन याच्या मागे आई वडील आणि विवाहित बहिण आहे. कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेतलेल्या एकुलत्या एका मुलाच्या जाण्याने रोहनच्या आईवडीलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे वाहन चालकाच्य जीवावर उठलेले असताना कल्याण शिळ मार्गावर सुरु असलेले मेट्रोचे काम त्यातच अवजड वाहनाची वाहतूक आणि तरीही वाहतुकीसाठी ठेवलेली निमुळत्या रस्त्यावर कुठे खड्डे तर कुठे सिमेंट पडल्याने रस्त्याचा ढासळलेला पोत, उंचसखल रस्ते, उखडलेले पेव्हर ब्लॉक यातून वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. दुचाकी चालकांना कामावर पोचण्याची असलेली घाई आणि खड्डेमय त्रासदायक रस्त्याचा जाच यामुळे दुचाकी चालकांना जीवावर उदार होऊनच वाहने चालवावी लागत असून या मार्गावरील मृत्यूचा सापळा हटविण्याची मागणी रामबाग खडक परिसराच्या माजी नगरसेविका वैजयंती घोलप यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!