Homeताज्या बातम्यादिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिवा | प्रतिनिधी

पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे दिवा शहराध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देत तातडीने प्रभावी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० मेपूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये कामे अपूर्ण असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्प पावसातही पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यावर्षी नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही प्रत्यक्ष कामांचा दर्जा आणि वेग समाधानकारक नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ मध्ये मोठ्या गाजावाजात नालेसफाई कामांचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचा दावा मनसेने केला आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधला असता २५० कामगार काम करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कामे नेमकी कुठे सुरू आहेत याची स्पष्ट माहिती देण्यात कंत्राटदार अपयशी ठरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, कामांवर देखरेख ठेवणारे स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी यांनाही नालेसफाईची ठिकाणे व कामगारांची संख्या याबाबत माहिती नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, ठाणे महापालिकेकडून शहरात ८० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी दिवा शहरात प्रत्यक्षात केवळ २० ते २५ टक्के काम पूर्ण झाल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा मनसेने केला आहे. आगामी पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

यावेळी दिवा शहराध्यक्ष तुषार भास्कर पाटील, शहर सचिव प्रशांत प्रभाकर गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, शरद पाटील, संतोष पाटील, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, महिला पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची...

दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची मागणी ठाणे | प्रतिनिधी दिवा शहरातील १२ वर्षीय कु. देवेंद्र आशिष सिंग...

error: Content is protected !!