Homeक्राईमकल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन 

कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या घडामोडींमुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

आज ऑल इंडिया पँथर सेना ठाणे जिल्हा युवक व अंबरनाथ शहर कमिटी यांच्या वतीने वालधुनी बुद्धभूमी येथे भेट देत आदरणीय भंते यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बौद्ध भिकूंनी धक्कादायक माहिती देत सांगितले की, स्थानिक राजकीय दबाव आणि पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून बौद्ध भिकूंवर दडपशाही केली जात आहे.

तसेच बुद्ध मूर्ती आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसून, संविधानिक मूल्यांवर देखील हल्ला झाल्याची भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “हा केवळ एका जागेचा प्रश्न नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. समाजाने आता गप्प बसून चालणार नाही. अन्यायाविरोधात एकजूट करून लढण्याची वेळ आली आहे.”

ऑल इंडिया पँथर सेना ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष तेजस सरवदे यांनी आक्रमक भूमिका घेत समाजाला आवाहन केले की, “बौद्ध समाजाने मतभेद विसरून एकत्र यावे. समाज विकणाऱ्यांपासून सावध राहावे. संघर्ष हा आमचा इतिहास आहे आणि अन्यायाविरोधात लढणे हीच आमची परंपरा आहे.”

दरम्यान, दिनांक 05 जून 2026 रोजी वालधुनी बुद्धभूमी, कल्याण येथे सर्व समाज बांधवांची महत्त्वपूर्ण चर्चा बैठक आयोजित करण्यात आली असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेल्या या प्रकरणामुळे येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची...

दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची मागणी ठाणे | प्रतिनिधी दिवा शहरातील १२ वर्षीय कु. देवेंद्र आशिष सिंग...

error: Content is protected !!