Homeताज्या बातम्याVikhroli Landslide : विक्रोळीत घरावर दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, आई-मुलगा जखमी, मुसळधार...

Vikhroli Landslide : विक्रोळीत घरावर दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, आई-मुलगा जखमी, मुसळधार पावसामुळे दुर्घटना

Mumbai Rains : मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.

मुंबई : ऐन दहीहंडीच्या दिवशी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भरात आला असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रभर मुंबई शहर-उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, वाशी, पनवेल या भागातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रात्री दोन वाजताच्या सुमारास एका घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये सुरेश आणि शालू मिश्रा या बापलेकीचा समावेश आहे, तर मायलेक आरती आणि ऋतुराज मिश्रा जखमी आहेत. याशिवाय आजूबाजूच्या घरातील दोघा जणांनाही दुखापत झाली आहे.

मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच पाचारण करण्यात आले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले असून चौघा जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आजूबाजूची घरं रिकामी करण्याचे काम सुरु आहे. मुंबई महापालिकेने डोंगर किनाऱ्यावरील भाग धोकादायक असल्यामुळे येथील घरात न राहण्याची नोटीस मिश्रा कुटुंबाला बजावली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. अनेक भागात पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी झाली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी ‘एक्स’ हँडलवरुन दिली आहे. मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकलही धिम्या गतीने धावत आहेत.

: मुंबईकरांनी अनावश्यक कारणांसाठी प्रवास टाळावा, गरज असेल, तरच घराबाहेर पडावे आणि काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस मुंबईकरांना मदत करण्यासाठी सतर्क आणि सज्ज आहेत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100, 112 किंवा 103 या क्रमांकावर डायल करा, असं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!