अखेर दिवा शहराला मिळाला स्वतंत्र पिनकोड विजय भोईर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

ठाणे, ता. २१ मे : दिवा शहराच्या स्वतंत्र ओळखीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली असून अखेर दिवा शहराला स्वतंत्र पिनकोड मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय अनंत भोईर यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

यापूर्वी मुंब्रा आणि दिवा या दोन्ही शहरांसाठी एकच पिनकोड वापरला जात होता. त्यामुळे नागरिकांना शासकीय कागदपत्रे, बँक व्यवहार, ऑनलाइन सेवा, कुरिअर वितरण तसेच विविध तांत्रिक प्रक्रियांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. दिवा शहराला स्वतंत्र ओळख मिळावी आणि स्वतंत्र पिनकोड जाहीर करण्यात यावा, अशी मागणी विजय भोईर यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती.

अखेर केंद्र शासनाने या मागणीची दखल घेत दिवा शहरासाठी स्वतंत्र 400611 हा नवीन पिनकोड मंजूर केला आहे. तर मुंब्रा शहरासाठी 400612 हा विद्यमान पिनकोड कायम राहणार आहे.

“आता तरी जागा हो दिवेकर” या अभियानाच्या माध्यमातून विजय भोईर यांनी केंद्र सरकारकडे वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे दिवा शहराला स्वतंत्र प्रशासकीय ओळख मिळाल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या मते, स्वतंत्र पिनकोडमुळे भविष्यात पत्ता व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असून शासकीय तसेच डिजिटल सेवांमध्ये होणारा गोंधळ कमी होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!