Homeताज्या बातम्याअखेर दिव्याला मिळाली स्वतंत्र ओळख! दिवा शहरासाठी 400611 हा नवा पिनकोड जाहीर....

अखेर दिव्याला मिळाली स्वतंत्र ओळख! दिवा शहरासाठी 400611 हा नवा पिनकोड जाहीर. विजय भोईर यांच्या संघर्षाला मोठे यश

अखेर दिव्याला मिळाली स्वतंत्र ओळख! दिवा शहरासाठी 400611 हा नवा पिनकोड जाहीर

ठाणे | प्रतिनिधी

दिवा शहराच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले असून दिव्यासाठी स्वतंत्र 400611 हा नवीन पिनकोड जाहीर करण्यात आला आहे. “आता तरी जागा हो दिवेकर” या सामाजिक अभियानाच्या माध्यमातून अनेक वर्षे सातत्याने पाठपुरावा करणारे श्री. विजय अनंत भोईर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

यापूर्वी दिवा आणि मुंब्रा या दोन्ही शहरांसाठी एकच पिनकोड वापरला जात होता. त्यामुळे शासकीय कागदपत्रे, ऑनलाइन सेवा, बँक व्यवहार, कुरिअर सेवा तसेच विविध तांत्रिक प्रक्रियांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत होता. दिव्याला स्वतंत्र ओळख मिळावी आणि स्वतंत्र पिनकोड जाहीर व्हावा, यासाठी विजय भोईर यांनी सातत्याने लढा उभारला होता.

“आता तरी जागा हो दिवेकर” या त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार, निवेदने आणि पाठपुरावा केला. यासाठी ते स्वतः आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई GPO तसेच ठाणे पोस्ट कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या होत्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर या मागणीला अधिक ताकद मिळाली.

दिव्याच्या पिनकोड प्रश्नाबाबत त्यांनी वेळोवेळी ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधले होते. तसेच दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार करून केंद्र सरकारसमोर हा प्रश्न सातत्याने मांडला होता.

याचबरोबर माननीय खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर केले होते. दिव्यासाठी स्वतंत्र पिनकोड किती आवश्यक आहे, हे त्यांनी संबंधितांना पटवून दिले होते.

अखेर या सातत्यपूर्ण संघर्षाचे फळ मिळाले असून दिव्यासाठी स्वतंत्र 400611 हा पिनकोड जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढील प्रशासकीय कार्यवाहीही सुरू झाली आहे.

अनेक वर्षांची ही मागणी पूर्ण झाल्याने दिव्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध सामाजिक संघटना, नागरिक तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून विजय भोईर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!