Homeताज्या बातम्या​निवडून येताच वर्षभरात दिव्यातील 'पाणी' आणि 'हॉस्पिटल'चा प्रश्न मार्गी लावणार; दिवा शहरात...

​निवडून येताच वर्षभरात दिव्यातील ‘पाणी’ आणि ‘हॉस्पिटल’चा प्रश्न मार्गी लावणार; दिवा शहरात शिवसेना ठाकरे गटाचे ॲड.रोहिदास मुंडे,ज्योती पाटील व योगेश निकम यांचा ‘मास्टरस्ट्रोक’*

*​निवडून येताच वर्षभरात दिव्यातील ‘पाणी’ आणि ‘हॉस्पिटल’चा प्रश्न मार्गी लावणार; दिवा शहरात शिवसेना ठाकरे गटाचे ॲड.रोहिदास मुंडे,ज्योती पाटील व योगेश निकम यांचा ‘मास्टरस्ट्रोक’*

तातडीने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून अद्यावत हॉस्पिटल सुरू करणार, तर पाणी प्रश्नासाठी योग्य नियोजन करणार असल्याची गॅरंटी

*​दिवा:* ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विकासाचा मोठा अजेंडा मांडत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडून आल्यास पहिल्याच वर्षात दिव्याचा पाणी प्रश्न कायमचा निकालात काढणार आणि शहरात सुसज्ज हॉस्पिटल सुरू करणार, अशी मोठी ‘गॅरंटी’ उमेदवारांनी दिली आहे.

​*पाणी प्रश्नावर ठोस नियोजन*

​दिव्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न हा येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रभाग २८ मधील उमेदवार योगेश गौतम निकम ,ज्योती राजकांत पाटील आणि ॲड.रोहिदास बामा मुंडे यांनी यावर ठाम आश्वासन दिले आहे की, पहिल्या वर्षाच्या आत प्रत्येकाला पुरेसे आणि दररोज पाणी मिळेल याचे नियोजन केले जाईल. यासाठी साठवण टाक्यांचे जाळे निर्माण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे.

*​आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटलची गॅरंटी*
​पाण्यासोबतच दिव्यातील आरोग्य सुविधेचा अभाव दूर करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे. तातडीची गरज म्हणून भाडेतत्त्वावर जागा घेऊन तातडीने हॉस्पिटल सुरू करण्याचे वचन देण्यात आले आहे. यामध्ये:
​लहान मुलांसाठी विशेष कक्ष.
​गरोदर माता-भगिनींसाठी स्वतंत्र विभाग. अतिदक्षता विभाग (ICU) ची सुविधा.

*​राजकीय वर्तुळात ‘मास्टरस्ट्रोक’ची चर्चा*
​दिव्यातील प्रलंबित प्रश्नांवर थेट ‘टाइमबाउंड’ गॅरंटी दिल्याने हा शिवसेना ठाकरे गटाचा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.

“दिवा शहरात जे आजवर कोणाला जमले नाही, ते आम्ही करून दाखवू,” असा विश्वास उमेदवार ज्योती पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करत असून दिलेला शब्द पाळण्याची शिवसेनेची रीत आहे. जे काम होणार आहे तेच आम्ही सांगत आहोत असे रोहिदास मुंडे,योगेश निकम यांनी म्हटले आहे. वर्षभराच्या आत हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिल्याने सध्या संपूर्ण दिवा शहरात याच विषयाची चर्चा रंगली आहे.

​या प्रभागातून योगेश गौतम निकम (२८ अ), ज्योती राजकांत पाटील (२८ ब) आणि ॲड.रोहिदास बामा मुंडे (२८ ड) हे ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!