दिवा प्रभाग क्रमांक २७ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गाथा विकास इंगळे यांना सर्व समाजघटकांचा भक्कम पाठिंबा
दिवा, ठाणे :
दिवा प्रभाग क्रमांक २७ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गाथा विकास इंगळे यांच्या प्रचाराला सर्व समाजघटकांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कोकणी माणूस, उत्तरभारतीय समाज तसेच बहुजन समाज यांचा ठाम आणि सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे चित्र प्रभागात दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना स्थानिक प्रश्न, मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छ प्रशासन याबाबत मांडलेली भूमिका सर्व समाजघटकांना एकत्र आणणारी ठरत आहे. त्यामुळे प्रभागातील विविध भाषा, संस्कृती आणि समाजांचे नागरिक मोठ्या विश्वासाने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहत आहेत.
“सत्ता नव्हे – समाज परिवर्तन!” या विचारधारेखाली सर्वांना सोबत घेऊन विकासाचा समान मार्ग तयार करण्याचा संदेश गाथा विकास इंगळे देत असून, त्याला कोकणी, उत्तरभारतीय आणि बहुजन समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
या व्यापक जनसमर्थनामुळे दिवा प्रभाग क्रमांक २७ मधील राजकीय वातावरणात निर्णायक बदल होत असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मजबूत पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















