Homeताज्या बातम्याआई कामानिमित्त मुंबईला गेली, एकट्या घरी असलेल्या विवाहित प्रिशाचं टोकाचं पाऊल, रत्नागिरी...

आई कामानिमित्त मुंबईला गेली, एकट्या घरी असलेल्या विवाहित प्रिशाचं टोकाचं पाऊल, रत्नागिरी हळहळलं

आई कामानिमित्त मुंबईला गेली, एकट्या घरी असलेल्या विवाहित प्रिशाचं टोकाचं पाऊल, रत्नागिरी हळहळलं.

रत्नागिरीच्या दापोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहीत तरुणीने स्वत:ला संपवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी : अलीकडे युवा वर्गामध्येही आत्महत्या करण्याचे प्रमाण हे चिंताजनकरीत्या वाढले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात झाली आहे. दापोली तालुक्यातील एका तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून स्वत:ला संपविल्याने मोठी उडाली आहे. प्रिशा सुदेश वाडकर असं स्वत:ला संपविणाऱ्या महिलेचे नाव आहे. प्रिशा या २८ वर्षांच्या होत्या. त्या गिम्हवणे उगवतवाडी येथील रहिवासी होत्या. त्यांनी अचानक स्वत:ला संपवून घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिशा ही गेले दोन वर्षे आपल्या आई सोबतच माहेरी दापोली येथे राहत होती. तिचे विवाहपूर्वीचे नाव हे पूनम परशुराम मोरे असे आहे. ती माहेरी तिची आई प्रतिभा पर्शुराम मोरे हिच्यासोबत राहत होती. आई प्रतिभा पर्शुराम मोरे सात ते आठ दिवस मुंबई येथे गेल्या होत्या.सुनेची डिलेवरी मुंबई येथे झाल्याने त्या मुंबई येथे गेल्या होत्या. त्यामुळे प्रिशा ही घरी एकटीच होती.

याच कालावधीत घरी एकटी असलेल्या प्रिशा हिने सोमवारी 5 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास गिम्हवणे उगवतवाडी येथील इमारती शेजारी असणाऱ्या विहीरीमध्ये विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन स्वत:ला संपवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी गेलेल्या संबंधित विहीर मालकाच्या हा सगळा धक्कादायक प्रकार लक्षात आला. त्यानंतर याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना देण्यात आली.

दापोली पोलिसांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गिम्हवणे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने प्रिशाला विहिरीबाहेर काढून अॅम्बुलन्सने उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या सगळ्या घटनेची खबर मृत्यू झालेली प्रिशा हिचे नातेवाईक रामचंद्र श्रीपत जाडे रा. खेर्डी देऊळवाडी यांनी दापोली पोलिसांना दिली आहे. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पतीबरोबर पटत नसल्याने ती गेले दोन वर्षे माहेरी आईकडे राहत होती. याच मानसिक नैराश्यातून हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!