विद्यार्थ्याला अमानुष मारहाण – ऑल इंडिया पँथर सेनेचा तीव्र निषेध.
घटने संदर्भात न्यायासाठी धाव!
छत्रपती संभाजीनगर, वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात 7 वी मध्ये शिकणाऱ्या ऋतुराज कांबळे या विद्यार्थ्यावर शिक्षक शहा यांनी बेदम मारहाण केली!
हा प्रकार फक्त मारहाण नाही तर आरटीईमधून शिकणाऱ्या मुलांना तुच्छतेने वागवण्याची आणि द्वेषाने छळ करण्याची मानसिकता आहे.
शाळा हे शिक्षणाचं मंदिर असताना तिथेच जर निर्दयी अत्याचार होत असतील तर हा समाजाला हादरवणारा विषय आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा तीव्र निषेध करते व स्पष्ट मागणी करते की –
➡️ निर्दयी शिक्षक शहा आणि विद्यार्थ्याला तुच्छतेने वागवणाऱ्या शाळा चालकावर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा!
➡️ पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!
ऑल इंडिया पँथर सेना नेहमीच वंचितांचा आवाज आहे, आणि या प्रकरणातही ऋतुराज व त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभी राहील!
संतोष भाऊ दत्तात्रय शेंडगे .
पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख
व कामगार नेते
ऑल इंडिया पँथर सेना

मुख्य संपादक: संदीप जाधव





















