Homeमहत्त्वाचेठाणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; भोसले दाम्पत्यास राष्ट्रपती पदक जाहीर

ठाणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; भोसले दाम्पत्यास राष्ट्रपती पदक जाहीर

ठाणे पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा; भोसले दाम्पत्यास राष्ट्रपती पदक जाहीर
ठाणे मध्यवर्ती कारागृहातील पोलिस दाम्पत्यास राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. यासह राज्यातील आणखी ६ अधिकाऱ्यांना सन्मानित केलं जाणार आहे.

ठाणे: गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राज्याच्या कारागृह विभागातील अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण आठ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यामध्ये ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले आणि त्यांचे पती अतिरिक्त अधीक्षक राजाराम भोसले यांचा समावेश आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाची २३ जून २०२३पासून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या राणी भोसले यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर कारागृह, नागपूर आणि येरवडा मध्यवर्ती कारागृहात अधीक्षक म्हणून काम केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडवणे, कैद्यांसाठी योग अभ्यासक्रम, ई-ग्रंथालय आणि इतरही विविध उपक्रम राबवणाऱ्या राणी भोसले यांच्यासह त्यांचे पती राजाराम भोसले यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक जाहीर झाले आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक असलेले राजाराम भोसले यांनी कल्याण कारागृह येथे अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. गेल्या वर्षी त्यांना कारागृहाचे सन्मानचिन्ह मिळाले होते. भोसले दाम्पत्यासह गजानन सरोदे (उपअधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह), संजय शिवगण (सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह), सुधाकर चव्हाण (हवालदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह), राजेश सावंत (हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह), संजय जाधव (हवालदार, भायखळा जिल्हा कारागृह), विद्या ढेंबरे (शिपाई, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह) यांनाही राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबत पदक जाहीर झाले आहे.

या सर्वांचे कारागृह विभागाच्या वतीने अपर पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) सुहास वारके आणि विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी अभिनंदन केले.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी देशातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. देशभरातील ६३५ पोलिसांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील ४९ पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये सात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना शौर्य पदके, तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल पदके, तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पदके जाहीर करण्यात आली आहे. अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी, राजेंद्रसिंग गौर यांना उल्लेखनीय सेवेबद्दल गौरविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!