Homeक्राईमआईचा दारुसाठी पैसे देण्यास नकार, पोटच्या पोराकडून जन्मदातीवर चाकूने प्राणघातक हल्ला; पुणे...

आईचा दारुसाठी पैसे देण्यास नकार, पोटच्या पोराकडून जन्मदातीवर चाकूने प्राणघातक हल्ला; पुणे हादरलं

Pune News : आईचा दारुसाठी पैसे देण्यास नकार, पोटच्या पोराकडून जन्मदातीवर चाकूने प्राणघातक हल्ला; पुणे हादरलं
Pune Crime News : पुण्यात एका मुलाने आपल्या आईवर चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून त्याने हे धक्कादायक कृत्य केलं. मुलगा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

: मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने झोपेत असलेल्या आईवर चाकूने वार केले. या हल्ल्या तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने, प्रसंगावधान राखत भावाने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे.

दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, आईवर मुलाचा हल्ला
आरोपीचे नाव कृष्णा पप्पू कांबळे (वय ३०, सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रोड, पुणे) असे असून, पीडित महिलेचे नाव कौशल्य पप्पू कांबळे आहे. या प्रकरणी पीडितेचा मुलगा आणि आरोपीचा भाऊ बाबासाहेब पप्पू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा कांबळे, आई कौशल्य कांबळे, भाऊ बाबासाहेब आणि वहिनी सोबत राहतो. आरोपीला दारूचे आणि इतर व्यसनाचे प्रचंड व्यसन असून, तो कोणतेही काम करत नाही. त्यामुळे तो नेहमी आईकडेच पैसे मागत असे आणि पैसे न दिल्यास वाद घालत असे.

घटनेच्या दिवशी रात्री उशिरा कृष्णाने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. आईने नकार दिल्याने त्याने मनात राग धरला. रात्री सर्व जण झोपेत असताना, तो स्वयंपाकघरातून चाकू घेऊन आला आणि आईच्या छातीवर चाकूने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरात आरडाओरडा झाला. भाऊ बाबासाहेब जागे झाले, पण तोपर्यंत आरोपी घरातून पळून गेला होता.

भावाने तात्काळ आईला रुग्णालयात दाखल केले. सध्या ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!