Homeक्राईमकोकणात पोलिसांना सापडलं तब्बल अडीच कोटींचं घबाड, ना ड्रग्ज ना कॅश मग...

कोकणात पोलिसांना सापडलं तब्बल अडीच कोटींचं घबाड, ना ड्रग्ज ना कॅश मग काय? रत्नागिरीत पोलिसांनी तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या इसमाला गजाआड केले आहे, तर २ कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र नामा : रत्नागिरीत पोलिसांनी तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या इसमाला गजाआड केले आहे, तर २ कोटींपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रत्नागिरी पोलिसांना तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड सापडले आहे. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दुर्मिळ प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आणताना ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथे सापळा येथे १ ऑगस्टला सापळा रचण्यात आला होता. रात्री उशिरा धाड टाकून तस्कराला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्मिळ प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने रत्नागिरी एम.आय.डी.सी. येथे सापळा रचला. काळोखात कोणतीतरी संशयित हालचाली दिसताच तरुणाला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडे मोठं घबाड मिळालं आहे. रात्रीच्या काळोखात दुर्मिळ माशाची उलटी विक्रीसाठी आणली होती.

व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग हा सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर या दुर्मिळ असलेल्या या माशाच्या उलटीला कोटी रुपयांची किंमत असल्याचा अनेकांमध्ये समज आहे. त्यामुळे ही या दुर्मिळ वस्तूची अनेकदा तस्करी केली जाते. पण हा कायद्याने गुन्हा आहे. यापूर्वीही कोकणात चिखलगाव अशा गंभीर स्वरूपाच्या तस्करी प्रकरणी कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र रत्नागिरी एमआयडीसी परिसरात पोलिसांनी केलेली कारवाई ही अलीकडे केलेल्या कारवायामध्ये सगळ्यात मोठी कारवाई ठरली आहे.

आरोपी संशयित इसम (1) एजाज अहमद युसूफ मिटकर वय 41 टा. घर नंबर 3746, पिंगी मोहल्ला मिरकरवाडा ता. जि. रत्नागिरी सध्या रा. कदमवाडी, कोकणनगर, रत्नागिरी याने ही तस्करी केल्याचे उघड झाले आहे. कोणतीही परवानगी न घेता, विनापरवाना तो लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करत होता. त्याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 152/2025 वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39, 42, 43, 44, 48, 51, 57 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, एजाज मिरकर याच्याकडून एकूण 2.5 किलो वजनाची 22,50,00,000/- किंमतीची अंबरग्रीस व एक 50 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकूण 2,50,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!