Homeआरोग्यNisha Shinde : माझी निशा मला हाक मारेल... लेकीच्या अंत्यसंस्कारानंतर बाप दोन...

Nisha Shinde : माझी निशा मला हाक मारेल… लेकीच्या अंत्यसंस्कारानंतर बाप दोन दिवस स्मशानाबाहेर बसून, मुंबई, मी तिला…

Nisha Shinde : माझी निशा मला हाक मारेल… लेकीच्या अंत्यसंस्कारानंतर बाप दोन दिवस स्मशानाबाहेर बसून, मुंबई, मी तिला…

Diva Girl Dog Bite Death : दिवा पूर्वेकडील नथुराम शिंदे यांची मुलगी निशा ही पाच वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक तिला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला.

, ठाणे : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुरडीने महिनाभराच्या उपचाराला दाद न देता अखेरचा श्वास घेतला. आपल्या लाडक्या लेकीचे दफन केल्यानंतरही आपली निशा उठून आपल्याला पुन्हा हाक मारेल या आशेने तिचे वडील दोन दिवस स्मशानाजवळच बसून होते.

काय झालं होतं?

दिवा पूर्वेकडील बेडेकरनगर परिसरातील नथुराम शिंदे यांची मुलगी निशा ही पाच वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. खेळता-खेळता ती कठड्यावर बसली, त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा चावा घेतला. निशाला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिला रेबीज इंजेक्शनचे ठरलेले तीन डोस देण्यात आले. मात्र चौथ्या डोसदरम्यान तिची तब्येत खालावली.३ डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी तिची प्रकृती स्थिर होती. मात्र १६ डिसेंबरला उपचाराचे शेवटचं इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. ती स्वतःलाच चावे घेऊ लागली. कुत्र्याप्रमाणे आवाज काढू लागल्याने सर्वच घाबरले. तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात तिचा २१ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम याने केला. यानंतर मुंबईतच तिच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यविधीनंतर पिता विमनस्क अवस्थेत

अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानातील कागदपत्र घेऊन येतो म्हणून तिचे वडील निघाले. नातेवाईक लोकलने दिवा स्थानकात उतरले मात्र नथुराम दिसत नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. दोन दिवस त्यांचा नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते सापडत नसल्याने सगळेच हवालदिल झाले होते.

वडील काय म्हणत होते?

शेवटचा प्रयत्न म्हणून नातेवाईक स्मशानात पोचले तर स्मशानाजवळ नथुराम विमनस्क अवस्थेत बसल्याचे दिसून आले. आपली मुलगी हाक मारेल आणि आपण तिला मायेने कुशीत घेऊ या आशेने ते दोन दिवस तिथेच होते हे पाहून नातेवाइकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. कसेबसे समजावून नथुराम यांना घरी आणण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!