Homeक्राईमMumbra Crime : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रायटर कक्षात 25 हजारांची लाच, सहायक...

Mumbra Crime : वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रायटर कक्षात 25 हजारांची लाच, सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा कारनामा; पोलिसांनी सापळा रचला अन्…

 ठाण्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रायटर कक्षात 25 हजारांची लाच घेताना लाचखोर सहायक पोलिस उपनिरीक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंब्रा ठाणे : बोगस डॉक्टरवरील दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. मुंब्रा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या रायटर कक्षात लाच घेताना अटक करण्यात आली.

मुंब्रा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक असलेले शशिकांत भालेराव (वय 49) याने तक्रारदार बोगस डॉक्टरवर कारवाई न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 25 हजार रुपये घेण्याचे भालेराव याने कबूल केले. या प्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मुंब्रा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे रायटर म्हणून भालेराव याच्याकडे जबाबदारी होती. त्यानुसार भालेराव याला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रायटर कक्षात तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला असून या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!