Homeताज्या बातम्याManoj Jarange Patil: धक्कादायक! मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक; स्कॉर्पियो-पिकअपच्या काचा...

Manoj Jarange Patil: धक्कादायक! मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक; स्कॉर्पियो-पिकअपच्या काचा फुटल्या, एक जखमी

Manoj Jarange Patil: धक्कादायक! मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक; स्कॉर्पियो-पिकअपच्या काचा फुटल्या, एक जखमी

Maratha Reservation News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली असून जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली, ज्यात काही गाड्यांचे नुकसान झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

अहिल्यानगर: मराठा समाजाला इतर मागास वर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलक बुधवारी अंतरवाली सराटी येथून शहागड-पैठणमार्गे मुंबईच्या दिशेने निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची आणि गणपतीची पूजा-आरती केल्यानंतर जरांगे यांना महिलांनी ओवाळले. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई सुरू झाली आहे. आता कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आणि ते मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र वाटेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला असून काही समाजकंटकांनी जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा ताफा अहिल्यानगर-कल्याण मार्गावर पोहोचल्यानंतर काही गाड्यांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक पिकअप आणि एका स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फुटल्या. तसंच यामध्ये एक आंदोलक जखमी झाल्याचं सांगितलं जात असून सदर जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर दगडफेक करणाऱ्या विकृत समाजकंटकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाच्या समन्वयकांनी दिली आहे.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी होणार जाहीर सभा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं रणशिंग फुंकलं असून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील आज शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळाला भेट देऊन मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघतील. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे. मराठा मोर्चाचे समन्वयक संदेश बारवे यांनी ही माहिती दिली. मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह बुधवारी सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीतून निघाले. ते आळेफाटा, ओतूरमार्गे जुन्नर येथे मुक्कामी आले. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जुन्नरमध्ये मोठी तयारी करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!