Homeक्राईममुंब्रा पोलिसांची धडक कारवाई ; १ कोटीहून अधिक लाखांचे अंमली पदार्थ जप्त

मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई ; १ कोटीहून अधिक लाखांचे अंमली पदार्थ जप्त

मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई ; १ कोटीहून अधिक लाखांचे अंमली पदार्थ जप्त

ठाणे ; विशेष प्रतिनिधी

मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे शहरचे हद्दीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करणा-यांवर कठोर कारवाई करणेबाबत वरिष्ठ. पो. नि.अनिल शिंदे यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनचे एन.डी.पी.एस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशनकडील स.पो.नि केदार, स.पो.नि जाधव व पथक असे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना काळसेकर रुग्णालयाच्या परिसरातील, ऐरोली-मुंब्रा ब्रिज बोगदयाजवळ, कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे निर्जन ठिकाणी एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसल्याने पोलीस पथक त्याचा जवळ गेले असता सदर इसम त्या ठिकाणाहून पळुन जावु लागल्याने पोलीस पथकाने नमुद इसमाचा पाठलाग करून चौकशी करून शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून १ कोटी १० लाख २५ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत केले.
या कारवाईबाबत पो.नि.अनिल शिंदे यांना माहिती दिल्यानंतर पो.नि नितीन पगार तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचांच्या उपस्थितीत नमुद संशयित इसमाची झाडा–झडती घेतली असता त्याच्याकडील ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये २ किलो २०५ ग्रॅम (चरस) अंदाजे १,१०,२५,०००/- (एक करोड दहा लाख पंचवीस हजार) रक्कमेचा (व्यापारी मात्रा असलेला) अंमली पदार्थ मिळुन आला. नमुद इसमाकडे अंमली पदार्थाची व्यापारी मात्रा मिळुन आल्याने आरोपी मोहम्मद हारून हसरत अली सिध्दीकी, वय वर्षे ४२ राहणार. मुंब्रा, ता. जि. ठाणे याच्या विरोधात गु.र.क. १९८८ / २०२५ एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) ii (क), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीत यास उपरोक्त गुन्हयात अटक करण्यात आली असुन आरोपीला न्यायालयाने ०८/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी मोहम्मद हारून हसरत अली सिध्दीकी हा सदरचा अंमली पदार्थ मोठया प्रमाणात जम्मु-काश्मीर राज्यातुन विक्रीकरीता घेवुन असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपी ठाणे परिसरात अंमली पदार्थाची विक्री करीत होता. तसेच आरोपीतावर अजमेर, राजस्थान येथे गुन्हा दाखल असुन ह्याहून अधिक गुन्हे दाखल असल्याची दाट शक्यता नाकारता येणे शक्य नाही याबाबत पुढील तपास करण्यात येत असुन आरोपीचे जम्मु-काश्मीर संपर्का बाबतदेखील अधिक तपास करण्यात येत आहे. मुंब्रा पोलीस ठाणे एन. डी. पी. एस पथकाने एन. डी. पी. एस कारवाईचा धडाका कायम ठेवत आजपावेतो ३२४ सेवन करणा-यांवर व २७ ताबा कारवाई करण्यात आलेल्या आहेत व ताबा कारवाईदरम्यान एकुण ३,४१,०५०००/- किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आलेले आहे. एन.डी.पी.एस पथकाचे मार्फतीने अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणा-या इसमांवर यापुढे देखील अशाचप्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त ठाणे शहर आशितोष डुंबरे, पोलिस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त परिमंडळ ०१ सुभाष बुरसे, सहा. पोलिस आयुक्त कळवा विभाग श्रीमती प्रिया डमाले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (प्रशासन) नितीन पगार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) राजु पाचोरकर, सपोनि रोहीत केदार, सपोनि गणेश जाधव, पोशि निलेश वर्पे, पोशि नवनाथ तेलंगे, पोशि सचिन पाटील, पोशि सागर महांगडे, पोशि वसीम तडवी, पो.शि सागर सपकाळे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!