सर्वोच्च न्यायालयावर बूट फेकणे हा लोकशाहीवर थेट हल्ला ! ऑल इंडिया पँथर सेना, धुळे जिल्हा तर्फे तीव्र निषेध
सर्वोच्च न्यायालयात मा. मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर एका विकृत वकीलाने (नाव – राकेश किशोर, वय ७१, मयूर विहार, दिल्ली) बूट फेकण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. हे कृत्य केवळ एका व्यक्तीचा संताप नसून भारतीय लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे.
या अमानुष घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना, धुळे जिल्हा तर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. आज दि. ०७/१०/२०२५ रोजी पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान व मागृहमंत्री यांना उद्देशून निवेदन सादर केले, जे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले.
मुख्य मागण्या :
१. आरोपी वकील राकेश किशोर याला तात्काळ अटक करण्यात यावी.
२. त्याच्यावर IPC कलम ३५३, ५०५ व अन्य लागू कायद्यांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा
३. SCB- (Supreme Court Bar Association) ने त्याचा वकिली परवाना कायमस्वरूपी रद्द करावा.
४. जर हा प्रकार संघटित कटाचा भाग असल्याचे आढळले, तर संबंधित सर्व व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
५. सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेत अधिक बळकटी आणावी, जेणेकरून न्यायाधीशांवर किंवा न्यायालयावर अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होऊ नयेत.
जातीवादाचा मुद्दा – राष्ट्राला जागे करणारा प्रश्न ! भारताचे सर्वोच्च न्यायालय हे न्याय आणि समानतेचं प्रतीक आहे. जर त्या न्यायासनावर बसलेल्या भारताच्या मुख्य न्यायमूर्तीनाही जातीवादाचा सामना करावा लागत असेल, तर हा देश अजूनही जातीवादाच्या जिवंत जखमेने ग्रासलेला आहे, हे स्पष्ट होते. अशा घटना दाखवून देतात की सामाजिक समता आणि बंधुता यासाठी अजून खूप काम बाकी आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने जातीवाद निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना, जनजागृती मोहीम आणि कायदेशीर दंडात्मक प्रणाली आणली पाहिजे. न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे फक्त एका व्यक्तीचा नाही, तर समतेच्या मूल्यांवर हल्ला आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचा ठाम इशारा :न्यायालय ही न्यायाची किल्ला आहे ती हल्लेखोरांची खेळणी नाही! जातीवाद संपला नाही, तो अजूनही जिवंत आहे – आणि आम्ही त्याच्या अंतासाठी लढा देत राहू!यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
सागर भाऊ मोहिते (जिल्हाध्यक्ष ) धुळे
अनिता सोनवणे महिला जिल्हाध्यक्ष
प्रवीण शिंदे जिल्हा उपाध्यक्ष धुळे
युवराज बाविस्कर शहर अध्यक्ष धुळे
किशोर बोरसे पाटील तालुका अध्यक्ष धुळे
सागर कढरे जिल्हा संघटक धुळे
शुभम वानखेडे धुळे महानगर प्रमुख
महेंद्र झाल्टे जिल्हा सचिव धुळे
संतोष अमृतसागर सामाजिक कार्यकर्ते

मुख्य संपादक: संदीप जाधव





















