Homeताज्या बातम्यालाडली बहीण योजनेसाठी पुन्हा तब्बल ₹410 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. दीपक...

लाडली बहीण योजनेसाठी पुन्हा तब्बल ₹410 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. दीपक केदार ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष

✅लाडली बहीण योजनेसाठी पुन्हा तब्बल ₹410 कोटी रुपये वळवण्यात आले आहेत.
एकीकडे सरकार म्हणतं — “तीन हजार रुपये खटाखट खात्यात येतील”, पण या योजनेसाठी वापरला जाणारा निधी मागास, दलित आणि आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राखून ठेवलेल्या सामाजिक न्यायाच्या विशेष निधीतून घेतला जातो, हे अत्यंत धक्कादायक आहे.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना खुश करण्यासाठी ही एक प्रकारची खैरात वाटपाची राजकारणाची खेळी सुरू आहे.
दरम्यान, रमाई घरकुल योजनेचे हप्ते थांबले आहेत, शिष्यवृत्ती मिळत नाही, दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी मिळत नाही, आणि आमच्या धार्मिक स्थळांना – जसे भीमा कोरेगाव – भूसंपादनाची गरज असूनही निधी दिला जात नाही.

शैक्षणिक क्षेत्रातही अन्याय सुरू आहे —
फेलोशिप मिळत नाही, स्वाधार योजना थांबल्या आहेत, नवीन होस्टेल बांधकाम होत नाही, वस्तीगृह उभे राहत नाहीत.
म्हणजेच, जिथे सामाजिक न्यायाची खरी गरज आहे, तिथेच निधी रोखला जातो आणि तोच पैसा राजकीय स्वार्थासाठी वापरला जातो.

अर्थमंत्री अजित पवार हे कायम जातीवादी भूमिकेतूनच काम करत आले आहेत.
ते महाराष्ट्रात सामाजिक अन्यायाला पोषक वातावरण निर्माण करत आहेत, असा ऑल इंडिया पॅंथर सेनेचा ठाम निषेध आहे.

ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे की —
सरकारने सामाजिक न्यायाचा निधी त्याच उद्देशासाठी वापरावा,
तो पूर्णपणे खर्च होण्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र कायदा करावा,
आणि दलित-आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी राखीव निधी वळवणे तत्काळ थांबवावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!