Homeक्राईम२१ लाखांचा गुटखा जप्त ; दोघे अटकेत देवरुख साखरपा पाली मार्गावरील घटना

२१ लाखांचा गुटखा जप्त ; दोघे अटकेत देवरुख साखरपा पाली मार्गावरील घटना

देवरुख साखरपा पाली मार्गावर २१ लाखांचा गुटखा जप्त ; दोघे अटकेत

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गस्तीदरम्यान देवरूख-साखरपा हद्दीमध्ये साखरपा ते पाली मार्गावर तब्बल २१ लाख ४० हजार १६० रुपयांचा पान मसाला व सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) आणि ७ लाखांचे पिकअप वाहन असा एकूण २८ लाख ४० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गंगाराम पडळकर (वय २८ , रा. इस्लामपूर, ता. वाळवा, सांगली), तेजस विश्वास कांबळे (२३ , रा. मिरज, सांगली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे एक पथक बुधवारी सकाळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे, देवरूख-साखरपा हद्दीमध्ये साखरपा ते पाली या मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एकजण त्याच्या ताब्यातील वाहनासह याहू ढाब्याच्या समोर संशयित हालचाली करत असताना दिसून आला. या पथकाला त्याच वाहनात बसलेल्या दुसऱ्या एकाचा संशय आल्याने या पथकाने त्यांच्या पिकअप गाडीची (एमएच-१० -सीआर- ८३६६ ) झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला व गुटखा मिळून आला. हा माल संगमेश्वर येथे वितरणासाठी नेला जात होता. दोन्ही संशयितांविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ओगले, पोलीस हवालदार झोरे, डोमणे, पालकर, कदम, खांबे, सवाईराम, दरेकर, सावंत व चालक कॉन्स्टेबल कांबळे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!