Homeक्राईमरत्नागिरी मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थासह एकास अटक; ५६२.५ ग्रॅम मुद्देमाल जप्त

रत्नागिरी मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थासह एकास अटक; ५६२.५ ग्रॅम मुद्देमाल जप्त

रत्नागिरी मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थासह एकास अटक; ५६२.५ ग्रॅम मुद्देमाल जप्त.

रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये येथे
२८ हजार १२५ रुपयांच्या गांजा सदृश अंमली पदार्थासह एका व्यक्तीस शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. या कारवाईत ५६२.५ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता भाट्ये येथील नेव्हल ऑफिस परिसरात करण्यात आली. इस्माईल सत्तार दर्वे (वय ४८, रा. मुरकरवाडी, भाट्ये) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांचे पथक गस्त घालत असताना इस्माईल दर्वे हा संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ३९ पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेला ५६२.५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ (क), २० (ब), (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!