Homeक्राईममूल हवं तर सासऱ्यांशी संबंध ठेव, हनिमूनहून परतताच सुनेला अश्लील सल्ला, पुण्यात...

मूल हवं तर सासऱ्यांशी संबंध ठेव, हनिमूनहून परतताच सुनेला अश्लील सल्ला, पुण्यात निवृत्त पोलिसाचा प्रताप

Pune मूल हवं तर सासऱ्यांशी संबंध ठेव, हनिमूनहून परतताच सुनेला अश्लील सल्ला, पुण्यात निवृत्त पोलिसाचा प्रताप.

Pune News: पुण्यात नात्यांना लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरातच हे सारं घडल्याने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे.:

पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र पुण्यात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे गुन्हेगाराची राजधानी बनलीय का असा प्रश्न पडू लागला आहे. कोयता गँगचा धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड, गँगवॉर, खून, बलात्कार, महिला अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आणखी एका अत्याचाराच्या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे

नुकतीच पुण्यातील कोंढवा परिसरात एका जन्मदात्या बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील सहकार नगर परिसरात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेकडे तिच्या सासऱ्याने शरीर संबंध ठेवण्याची मागणी केल्याची संतापजनक घटना पुण्यातील सहकारनगर परिसरात घडली आहे. यात सर्वात धक्कदायक बाब म्हणजे ही मागणी करणारा इसम माजी पोलीस अधिकारी आहे.

या प्रकरणात पीडित महिलेचा पती गौरव जयसिंग तांबे (वय 35), सासू श्रद्धा जयसिंग तांबे (56 वय) आणि सासरे जयसिंग तांबे (वय 61) यांच्या विरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला हिचा विवाह आरोपी पती गौरव तांबे यांच्यासोबत पाच महिन्यांपूर्वी झाला होता. विवाहनंतर पीडिता आणि तिचा पती हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले होते. मात्र, त्या ठिकाणी पीडितेच्या पतीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला.

पीडितिने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती गौरव तांबे हा नपुंसक आहे. त्यामुळे पती गौरव तांबे आणि सासू श्रद्धा तांबे यांनी तुला मूल हवं असेल तर सासऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेव असा दबाव आणला. सासरऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीकडून आणि सासूकडून आपल्यावर वारंवार दबाव आणला जात असल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

एकीकडे पती आणि सासूचा हा त्रास सुरू असताना सासरे जयसिंग पवार 10 सप्टेंबरच्या रात्री पीडितेच्या घरी आले, त्यांनी तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अखेर हा सगळा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने पोलिस ठाणे गाठत पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!