✅ मुंबईत लाखों लोकांचे ऐतिहासिक मोर्चे धडकलेले आहेत. किसान आदिवासी मोर्चा, आंबेडकर भवन बचाओ मोर्चा असे ऐतिहासिक मोर्चे मुंबईत धडकले.
असं असताना सरकार मराठा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न का करत आहे? त्यांनाही त्यांच्या मागण्या घेऊन सरकार दरबारी येण्याचा अधिकार आहे.
मुंबई काय गुजरातला जोडलेली नाही, बलिदान देऊन क्रांतिकारकांनी महाराष्ट्राला जोडलेली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मराठा आंदोलकांबद्दल सरकारची भूमिका आकस बाळगल्यासारखी आहे.
सरकारने या आंदोलनाचे स्वागत करावे आणि चर्चा करून सकारात्मक भूमिकेवर यावे.
दीपक केदार ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष

मुख्य संपादक: संदीप जाधव





















