Homeताज्या बातम्यामनोज जरांगेंच्या आणखी एका मागणीला यश, सरकारनेही शब्द पाळला, २१ कुटुंबियांना २...

मनोज जरांगेंच्या आणखी एका मागणीला यश, सरकारनेही शब्द पाळला, २१ कुटुंबियांना २ कोटी १० लाखांची मदत

 मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं. त्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाने जाहीर केली आहे. नांदेडमध्ये २१ कुटुंबांना ही मदत मिळणार आहे.

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. त्यांनी पाच दिवस आझाद मैदानावर उपोषण केलं. जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले होते. शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्यासह अनेक मागण्या मान्य केल्या, त्या सोबतच आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवाना आर्थिक मदत जाहीर केली. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानुसार शासनाने नांदेड जिल्ह्यातील २१ कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये प्रमाणे २ कोटी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती. यापूर्वी ५८ मोर्चे निघाले होते. मागील दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाचा लढा वाढत गेला. रस्ता रोको आंदोलनासह अनेक मोर्चे देखील काढण्यात आले. गावात राजकीय नेत्यांना बंदी देखील घालण्यात आली होती. याच मागणीसाठी अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. एकट्या नांदेड जिल्ह्यात आता पर्यंत ३४ जणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती.

दरम्यान आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणा दरम्यान केली होती. त्यापैकी नांदेडमधील आत्महत्या केलेल्या २१ जणांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी १० लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आत्महत्या केलेल्या १३ कुटुंबियांना आर्थिक मदत आणि दोन जणांना शासकीय नोकरीचा लाभ देण्यात आला आहे.

संजय गोविंदराव खानसोळे ( रा.कामळज ता मुदखेड ), प्रकाश व्यंकटी जाधव (रनसुगाव ता. नायगाव), सुमित शरद ढेम्बरे (रा. बेरळी ता. लोहा), तानाजी बाबाराव जाधव (रा. डोर ता. अर्धापूर ), प्रमोद जानकीराम भुजबळ (रा. धानोरा ता. लोहा), प्रभाकर नामदेव पवार (रा. खरबी ता. लोहा), तिरुपती रामचंद्र लांडगे (रा. मांडणी ता. नायगाव), राजेश बालाजी भाकरे (रा. गडगा ता. नायगाव ), सम्रत हणमंत जाधव (रा. केदारवडगाव ता. नायगाव), शाम संजय कपाटे (रा. येळेगाव ता. अर्धापूर), अमोल विश्वभंर शिंदे किशन बाबुराव आबादार (रा. सावरगाव ता. अर्धापूर ), जयवंत माधव पुयड (रा. वाडीपुयड ता नांदेड), शिवाजी पांडुरंग सितापराव (रा. रोडगी ता. अर्धापूर ), कृष्णा हणमंत जाधव (रा. देगांव ता. अर्धापूर ), बाबुराव उर्फ साईनाथ प्रकाश कोरडे (रा. तरोडा नांदेड), सुमित शरद ढेबरे (रा. बेरली ता. लोहा), गजानन उद्धवराव देशमुख (रा. इरापूर ता. हदगाव), भिवजी देविदास बेलकर (रा. बळेगाव ता. नायगाव), आनंदा बळवंत शिंदे (रा. कोलंबी ता. नायगाव ), बालाजी नारायण जाधव (रा. चौडी ता. लोहा ) आदी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!