Homeक्राईमभावाला जीवे मारण्याची धमकी देत एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

भावाला जीवे मारण्याची धमकी देत एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 कपडे काढ नाहीतर भावाला संपवेन; अल्पवयीन मुलीसोबत नराधमाने नको ते केलं, रडत रडत घरी आली अन्… नवी मुंबईत संताप

 भावाला जीवे मारण्याची धमकी देत एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

नवि मुंबई 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला तिच्या भावाला संपवण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेने नवी मुंबईत संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई कामावर गेली असताना, ही अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना ही घटना घडली आहे. आरोपीने व्यक्तीने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत तिला आपल्या घरी नेलं. त्यानंतर, त्याने तिला धमकी दिली. जर तिने आरोपीतं म्हणणं ऐकलं नाही, तर तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी तिला दिली. भावाला मारण्याची धमकी ऐकताच ती घाबरली. अल्पवयीन मुलीला दबावाखाली आणून तिचे कपडे काढण्यास भाग पाडले गेले आणि मग आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर घरी परतल्यावर मुलीने रडत रडत तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने ताबडतोब नेरुळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीला त्याच्या घरुन अटक केली.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आरोपीची चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणाशी संबंधित अधिक पुरावे गोळा केले जात आहेत. मुलीला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटावे यासाठी तिचे समुपदेशन देखील केले जाणार आहे.

या घटनेने नवी मुंबई परिसरात संतापाची लाट उसळली असून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. त्याच प्रमाणे लहान मुलांवरील अत्याचाचारे प्रमाण वाढले असल्याचंही या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलिस याबाबत काय अधिक तपास करून सबळ पुरावे कोर्टात सादर करून या आरोपीला शिक्षा देण्यास भाग पडतात याबाबतही पाहणे महत्त्वाचे असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!