Homeक्राईमबिर्याणीची मेजवानी पोलिसांच्या अंगलट; कैद्यांच्याकल्याण मारहाणीत जखमी पोलिसच चौकशीच्या फेऱ्यात,

बिर्याणीची मेजवानी पोलिसांच्या अंगलट; कैद्यांच्याकल्याण मारहाणीत जखमी पोलिसच चौकशीच्या फेऱ्यात,

बिर्याणीची मेजवानी पोलिसांच्या अंगलट; कैद्यांच्या मारहाणीत जखमी पोलिसच चौकशीच्या फेऱ्यात, प्रकरण काय?

 कारागृहात गंभीर गुन्ह्यांत शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी न्यायालय ते कारागृह या २० मिनिटांच्या प्रवासासाठी थेट बिर्याणीची सोय करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

 न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या कैद्यांना पुन्हा कारागृहात नेताना बराच वेळ पोलिस व्हॅनमध्ये ताटकळत बसावे लागल्याने संतापलेल्या कैद्यांनी पोलिसांना मारहाण करत त्यांच्यावर बिर्याणीचे कंटेनर फेकून मारल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास कल्याण न्यायालयाबाहेर घडली होती. या घटनेनंतर कैद्यांना दुपारच्या जेवणात बिर्याणी का आणि कोणी दिली?, असा प्रश्न उपस्थित झाल्याने कैद्यांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलिस कर्मचारीच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केल्याचे सांगितले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना बिर्याणी का दिल्या जात असल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले असले तरी पोलिसांसह कारागृह – प्रशासनाकडून कायमच हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. यामुळे कैद्यांना कारागृहात बिर्याणी मिळते, याबाबतचे कोणतेही पुरावे अद्याप सिद्ध करता जाले नव्हते. बुधवारी कल्याण न्यायालयात सुनावणीसाठी आणलेल्या कैद्यांना पुन्हा कारागृहात नेण्याचे आदेश दिल्यानंतर एका कैद्याची सुनावणी सुरू असल्याने इतर कैद्यांना पोलिसांनी पोलिस व्हॅनमध्ये बसवून ठेवले होते. जवळपास ४५ मिनिटे कैद्यांना प्रतीक्षा करावी लागल्याने ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्याला कैद्यांनी जाब विचारत शिवीगाळ करत गोंधळ घातला. यामुळे इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या कैद्यांना दमटावत शांत करण्याचा प्रयत्न करताच या कैद्यांनी थेट पोलिसांच्या कॉलरला हात घालत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. एवढ्यावरच हे कैदी थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्यासाठी शेवटच्या सीटवर ठेवलेले बिर्याणीचे कंटेनर पोलिसांवर फेकून मारल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रारीत नमूद केल्यानंतर त्यांच्याच अडचणींत वाढ झाली आहे. वास्तविक कैद्यांना कारागृहात कोणते जेवण दिले जावे, कधी दिले जावे, त्याचे प्रमाण किती असावे, त्यात तिखट-मीठ-पीठ किती असावे, याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त कैद्यांना अतिरिक्त जेवण हवे असल्यास त्यांना त्यासाठी परवानगी घेऊन पैसे देऊन खरेदी करावे लागते. मात्र तरीही कैद्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही, असे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे.
ड्युटीवर असताना मारहाण करणाऱ्या कैद्यांना धडा शिकविण्यासाठी जखमी पोलिसांनी पोलिस व्हॅन थेट पोलिस ठाण्यात नेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत घडलेला प्रकार नमूद केला असला तरी आता कैद्यांची बिर्याणी पार्टी वादात सापडण्याची चिन्हे आहेत.वास्तविक कैद्यांना कारागृहात कोणते जेवण दिले जावे, कधी दिले जावे, त्याचे प्रमाण किती असावे, त्यात तिखट-मीठ-पीठ किती असावे, याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त कैद्यांना अतिरिक्त जेवण हवे असल्यास त्यांना त्यासाठी परवानगी घेऊन पैसे देऊन खरेदी करावे लागते. मात्र तरीही कैद्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही, असे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे.
ड्युटीवर असताना मारहाण करणाऱ्या कैद्यांना धडा शिकविण्यासाठी जखमी पोलिसांनी पोलिस व्हॅन थेट पोलिस ठाण्यात नेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत घडलेला प्रकार नमूद केला असला तरी आता कैद्यांची बिर्याणी पार्टी वादात सापडण्याची चिन्हे आहेत.  प्रकरणी गुन्हा दाखल होताच या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिस व्हॅनमध्ये कैद्यांसाठी बिर्याणी कशी आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. –अतुल झेंडे, पोलिस उपायुक्त

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!