Homeताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातील #लोहा येथे #शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी...

नांदेड जिल्ह्यातील #लोहा येथे #शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन आणि त्यासोबत पक्षप्रवेश सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

नांदेड जिल्ह्यातील #लोहा येथे #शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन आणि त्यासोबत पक्षप्रवेश सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून मनोगत सादर केले. यावेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

कायदे शेतकऱ्यांसाठी असतात, शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले असल्याचे याप्रसंगी नमूद केले.

मुख्यमंत्री असताना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत चार सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली तसेच बंद पडलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला. राज्यातील ४.२९ लाख कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देत ३२.४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून मराठवाड्यावरचा ‘दुष्काळवाडा’ हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला.

दसऱ्याच्या वेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न बोलावता थेट शेतकऱ्यांच्या मदतीला पाठवले आणि शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी जोडधंदे उपलब्ध करून देणे, शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात शेतकरी नेते शंकरराव धोंडगे यांच्या शिवसेना प्रवेशाचे स्वागत केले . याप्रसंगी ते म्हणाले की ते फक्त नांदेडचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक गावात शेतकरी संघटना उभारून शेतकऱ्यांच्या समस्या थेट सोडवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार हेमंत भाऊ पाटील, माजी मंत्री श्रीराम म्हेत्रे, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम, विजय गिरडे, विवेक देशमुख, उमेश मुंडे, गंगाधर बडुरे, सुधाकर भालेराव, विशाल कदम, आनंद बरसे, बाळासाहेब देशमुख, शंकर अण्णांचे दोन्ही सुपुत्र तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Shivsena #Nanded #EknathShinde #Maharashtra
Shivsena – शिवसेना Hemant Patil – हेमंत पाटील Balajirao kalyankar

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!