Homeताज्या बातम्याधक्कादायक! आप चुनाव हार रहे हो...; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

धक्कादायक! आप चुनाव हार रहे हो…; मतमोजणीपूर्वीच उमेदवाराला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज

तेल्हारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या शामस्कारांच्या तक्रारीने खळबळ !

अकोला : नुकत्याच पार पडलेल्या तेल्हारा नगर परिषद निवडणूक २०२५ च्या निकाल प्रक्रियेवर संशय व्यक्त करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पॅनल आणि तेल्हारा नगर विकास मंचच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या सिद्धार्थ शामस्कार यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निकालाच्या दिवशी सकाळीच एका अज्ञात नंबरवरून “तुम्ही निवडणूक हरत आहात” असा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज आल्याने ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?

विद्या शामस्कार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार होते. मात्र, त्यादिवशी सकाळी १०:२३ वाजता त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून ‘हाय’ असा मॅसेज आला.

त्यानंतर १० वाजून ३६ मिनिटांनी “आप चुनाव हार रहे हो” आणि पुढे १० वाजून ४३ मिनिटांनी “१३६९ वोट से” असे धक्कादायक मॅसेज आले. विशेष म्हणजे, ज्यावेळी हे मॅसेज आले, त्यावेळी अधिकृत निकाल जाहीर व्हायचे होते.

गृहमंत्री कार्यालयाचा फोटो आणि संशयास्पद प्रोफाईल :

संबंधित अज्ञात क्रमांकाच्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईलवर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो असून सोबत कोट-टाय घातलेला एक इसम दिसत आहे. तसेच, त्या बिझनेस अकाऊंटवर “साकेतकुमार पी. एस. टू होम मिनीस्टर” असे नाव दिसत आहे. निकालाच्या गडबडीत असल्याने शामस्कार यांनी २२ डिसेंबर रोजी रात्री हे मॅसेज पाहिले, त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. असे विद्या शामस्कार यांनी सांगितले.

राजकीय षडयंत्राचा आरोप :

शामस्कार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “विशिष्ट राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावरून ईव्हीएम मशीनमध्ये अनधिकृत हेरफेर करण्यात आली आहे. मॅसेजमध्ये वर्तवलेला पराभवाचा आकडा आणि प्रत्यक्ष निकालातील तफावत पाहता, हे एक सुनियोजित राजकीय षडयंत्र असल्याचे दिसते. निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून माझी आणि जनतेची फसवणूक झाली आहे.”

सखोल चौकशीची मागणी

विद्या शामस्कार यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित मोबाईल धारकाचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पॅनलचे ५ उमेदवार निवडून आले असून ७ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता निवडणुकीत ‘घोळ’ झाल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे. त्यांनी पुराव्यादाखल संबंधित मॅसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांना सादर केले आहेत.

या प्रकरणामुळे तेल्हारा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आता या अज्ञात ‘साकेतकुमार’ नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!