Homeआरोग्यदिव्यातील ड्यू ड्रॉप शाळेत किळसवाणा प्रकार; मुलांना बाथरुम मध्ये वापरायला गटाराचे पाणी

दिव्यातील ड्यू ड्रॉप शाळेत किळसवाणा प्रकार; मुलांना बाथरुम मध्ये वापरायला गटाराचे पाणी

दिवा शहरातील मातोश्री नगर येथे असलेल्या ड्यू ड्रॉप शाळेमध्ये किळसवाणा प्रकार घडला असून शाळेतील मुलांना बाथरुम मध्ये थेट गटाराचे पाणी वापरायला देण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे.

ड्यु ड्रॉप शाळेमध्ये मुलांना बाथरुम मध्ये गटाराचे पाणी वापरायला दिले जात असल्याची तक्रार दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे पालकांनी केली होती. त्यानुसार आज त्याची सत्यता पडताळण्यासाठी आज मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी हा अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला. मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या शाळा संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक शासन करण्याची मागणी दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत तात्काळ शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी सर्व व्हिडिओ पाठवल्यानंतर उपायुक्तांनी तात्काळ पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाची टीम पाहणी करण्यासाठी पाठवत असल्याचे सांगितले.

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिक्षण विभागाने संबंधित शाळेची मान्यता रद्द करून मुलांना दुसऱ्या शाळेत हलवावे अशी मागणी दिवा मनसेकडून करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, उपशाध्यक्ष जितेंद्र गुरव हे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!