Homeताज्या बातम्यादिवा शहरात १ मेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्यविक्रीचा धोका; कारवाईची मागणी तीव्र.

दिवा शहरात १ मेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्यविक्रीचा धोका; कारवाईची मागणी तीव्र.

विशेष बातमी | महाराष्ट्र नामा

दिवा शहरात १ मेच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्यविक्रीचा धोका; कारवाईची मागणी तीव्र.

दिवा (ठाणे) : उद्या १ मे २०२६ रोजी राज्यभर महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमा हे तीन महत्त्वाचे दिवस एकाच दिवशी साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासन नियमांनुसार मद्यविक्री बंद राहणे अपेक्षित आहे. मात्र, दिवा शहरात काही ठिकाणी बेकायदेशीरपणे मद्यविक्री सुरू असल्याचे समोर येत असून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवा परिसरातील विविध बिल्डिंग, चाळी आणि गुप्त ठिकाणी काही व्यक्तींकडून अनधिकृत मद्यविक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणांची आणि संबंधित व्यक्तींची माहिती स्थानिकांकडे उपलब्ध असूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, उद्या बंदीच्या दिवशी जर मद्यविक्री आढळली तर संबंधित विक्रेते, पुरवठादार तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात पुराव्यासह तक्रारी दाखल करण्यात येतील. तसेच, सोशल मीडियावर लाईव्ह माध्यमातून या प्रकारांचा पर्दाफाश करण्याची तयारीही दर्शविण्यात आली आहे.

दिवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसर आणि इतर संवेदनशील भागांमध्ये तातडीने छापेमारी करून बेकायदेशीर मद्यविक्री रोखावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही व्यक्तींकडून लहान-मोठे आमिष दाखवून इतरांकडून मद्यविक्री करवून घेतली जात असल्याचाही आरोप पुढे आला आहे.

  1. पोलीस प्रशासनाला या सर्व बाबींची माहिती असूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी आणि उद्याचा दिवस शांततेत व नियमांचे पालन करून पार पडावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

— संपादक : संदीप जाधव
महाराष्ट्र नामा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!