महाराष्ट्र नामा न्यूज मध्ये आपले स्वागत आहॆ
- दिवा शहरांत पहिल्यांदाच गावठी दारूच्या भट्टी वर्ती कारवाई.
गणेश नगर, दिवा पूर्व खाडी पट्ट्यात अवैध गावठी हातभट्टी गाळप केंद्र सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून दिवा पोलीस चौकी येथील सपोनि वसंत खतेले, सपोनि अमोल कोळेकर, सपोनि राजेंद्र तोरडमल, पोउपनि सुभाष मोरे, पोलीस अंमलदार गोविंद मुंढे, जयेश तामोरे, महेश जाधव, वसीम तडवी, निळकंठ लोंढे यांचेसह गणेशनगर-आगासन दिवा पूर्व यादरम्यानचे खाडी परिसरात पंचांसह जाऊन पाहणी केली असता, गणेश नगर खाडीपट्ट्यातील दलदलीमध्ये गावठी हातभट्टी गाळप कारखाना व 200 ड्रम दारू बनविण्याचे रसायन (36000 लिटर) मिळून आले. याबाबत इ साक्ष एप्लीकेशन मध्ये व्हिडिओ ग्राफी करून व सविस्तर पंचनामा करून गावठी हातभट्टी गाळप कारखाना, दोनशे ड्रम आणि त्यामधील दारू निर्मितीचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे.
परंतु ही गावठी दारूची भट्टी नक्की कोणाच्या मालकीची आहॆ. आणि ही भट्टी कधीपासून चालू आहॆ याचा तपास अजून बाकी आहॆ
चॅनेल ला Subscraibe नक्की करा संपादक संदीप जाधव
अश्याच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेल ला Subscraibe नक्की करा संपादक संदीप जाधव
बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा

मुख्य संपादक: संदीप जाधव





















