Homeक्राईमदापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक;

दापोलीत ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक;

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
दापोली, ता. २५ : सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दापोली तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटने रंगेहात पकडले. ही कारवाई आज सायंकाळी दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी मौजे तेरे वायंगणी येथील जमीन खरेदी केली होती. संबंधित खरेदीखताची सातबाऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने पडताळणी करून सापळा कारवाईचे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने रक्कम दिल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकत बंडे यांना ताब्यात घेतले.
संशयित श्रद्धा बंडे या मागील वर्षी सेवेत दाखल झाल्या होत्या. तहसील कार्यालयातच लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रेंडे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!