नौपाडा पोलीस ठाणे, ठाणे
जुन्या भांडणाच्या रागातुन जीवे ठार मारण्यासाठी गोळीबार करणा-या अट्टल गुन्हेगारास अवघ्या ४८ तासात अटक करून गुन्हा उघडकीस आणलेबाबत.
दिनांक २७/०३/२०२६ रोजी ००.४५ वा. सुमारास नाशिक मुंबई हायवे, धर्मवीर कट, नौपाडा जि. ठाणे येथील शेल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरीता आलेले फिर्यादी नामे इंजमाम अमीरूददीन सिध्दीकी वय २६ वर्षे, हे त्यांची गाडी अॅक्टीव्हा कं. MH 04 MB 1065 यात पेट्रोल टाकण्यासाठी आले असता यातील आरोपी नामे जबीउल्ला शफीकुररहमान खान याने मागील दोन महिन्यापुर्वी ” तेरा बाप कैसे मरा, ट्रेन से कटकर मराना, कुत्ते के मौत” असे फिर्यादी यांचे वडीलांबददल अपशब्द वापरल्याचे कारणावरून त्यांच्यात वारवार भांडण होत असल्याने त्याचा राग मनात धरून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उददेशाने कोणत्यातरी बनावटीचे अग्निशस्त्राने त्यांच्यावर दोन राउंड फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांची मैत्रीण नामे इंजल एलबीस फर्नांडीस हीस बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादी यांची गाडी जबरीने घेवून गेलेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. २७/०३/२०२६ रोजी नौपाडा पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ८४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०९(१), ३०९ (४),३५१ (३), ३५२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महा. पो. कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील आरोपी नामे जबीउल्ला शफीकुररहमान खान याने सदर गुन्हा केलेनंतर त्याचे वापरते मोबाईल क्रमांक बंद करून आपले अस्तित्व लपवुन राहत होता. सदर आरोपीस पकडणे पोलीसांना समोर एक आव्हाहन ठरले होते. मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे सलग दोन दिवस आरोपीच्या शोधात असताना पो.ना/७१८३ सुनिल धोंडे यांना त्यांचे गुप्तबातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहीतीवरून सदर आरोपी नामे जबीउल्ला शफीकुररहमान खान वय ३९ वर्षे, रा. हजुरी दर्गा नुरी रोड, सिराज खान चाळ, वागळे ईस्टेट, जि. ठाणे हा रोड नं. ०२, कुसुमाग्रज मार्ग, समतानगर चौक, वागळे ईस्टेट, ठाणे या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने पोलीस पथकाचे मदतीने सापळा रचुन दिनांक २९/०३/२०२६ रोजी सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असुन आरोपीची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये त्याने गुन्हयात वापरलेले एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र (पिस्टल) व गुन्हयात चोरीस गेलेली पांढ-या रंगाची अॅक्टीवा मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि भांगे करीत असुन आरोपीस मा. न्यायालयात हजर करून त्याची दिनांक ०२/०४/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















