Homeताज्या बातम्यामहिला IPS अधिकारी दमदाटी प्रकरण, अजित पवारांकडून अखेर स्पष्टीकरण

महिला IPS अधिकारी दमदाटी प्रकरण, अजित पवारांकडून अखेर स्पष्टीकरण

 महिला IPS अधिकारी दमदाटी प्रकरण, अजित पवारांकडून अखेर स्पष्टीकरण

Ajit Pawar on IPS Anjali Krishna : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी प्रकरणार भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनी याबाबत व्हायरल झालेल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : सोलापूरच्या माढा तालुक्यातील करमाळाच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरुन दमदाटी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन विरोधकांवनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांचा महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या महिला IPS अधिकाऱ्याला अजित पवार यांनी दमदाटी केली होती. संबंधित परिसरातील काही जणांनी कारवाई करायला गेलेल्या तहसीलदार, तलाटी यांना दमदाटी केल्याचादेखील आरोप करण्यात आला होता. तसेच पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा या आपल्या टीमसह कारवाई करायला गेल्या असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन केला होता.

अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार असून कारवाई तातडीने थांबवा, असे आदेश दिले होते. पण महिला पोलीस अधिकारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी अजित पवार यांना संबंधित आदेश आपल्या वैयक्तिक फोन नंबरवर फोन करुन कारवाई थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली. यानंतर अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांचा फोन नंबर घेत त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी अजित पवार यांनी तुझी एवढी हिंमत, तुझ्यावर कारवाई करणार, असा इशारा आयपीएस अंजली कृष्णा यांनी दिला होता. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड होत आहे. यामुळे अखेर अजित पवार यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा : अजित पवार यांना भिडणाऱ्या महिला IPS अधिकारी अंजली कृष्णा कोण?)“मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे”, अशी देखील भूमिका अजित पवार यांनी मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!