Homeताज्या बातम्यादिव्यात शिंदे गटाला ‘लाडक्या बहिणींचा’ मोठा धक्का मिंधे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून...

दिव्यात शिंदे गटाला ‘लाडक्या बहिणींचा’ मोठा धक्का मिंधे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

दिव्यात शिंदे गटाला ‘लाडक्या बहिणींचा’ मोठा धक्का
मिंधे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

दिवा:- दिवा शहरात शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, शिंदे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

हा जाहीर प्रवेश आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मा. वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यामध्ये शर्मिला अजय म्हात्रे (शाखा संघटिका), मनाली मंगेश उगवे, वनिता देवकर, नंदा चव्हाण, भारती फडणीस, भाग्यश्री येवले, वृषाली जगताप, सपना पवार, गीता डोके, कुंदा डिके व ज्योती दलवी या महिला पदाधिकाऱ्यांनी मिंधे गटाच्या कार्यपद्धतीला रामराम ठोकत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

शिंदे गटात दिवा शहरात सुरू असलेल्या मनमानी कारभार, महिलांना विश्वासात न घेणे, संघटनात्मक निर्णयांपासून दूर ठेवणे व केवळ नावापुरती “लाडकी बहीण” योजना या धोरणामुळे आपण कंटाळलो असल्याचे या महिला पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रत्यक्षात महिलांचा सन्मान करणारा, निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणारा आणि खऱ्या अर्थाने महिलांना बळ देणारा पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रवेशावेळी कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर, धनंजय बोराडे, जिल्हा संघटक अभिजीत सावंत, जिल्हा संघटिका वैशाली दरेकर, युवा जिल्हा अधिकारी प्रतीक पाटील, विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे, शहरप्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दिवा शहरात शिंदे गटाचा फसवा कारभार आता उघड होत असून, महिलांच्याच नेतृत्वातून शिंदे गटाला जबरदस्त चपराक बसल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढवणारा असून, दिव्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!