Pune CP Amitesh Kumar: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन..
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दारू विकाल तर सात पिढ्या विसरणार नाहीत अशी कारवाई करू, असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दारू विक्रेत्यांना दिला आहे. तसेच दारूच्या दुकानातही कुणी दिसला तर त्याच्यावरही कारवाई करेन, असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. टिळक रोड विसर्जन मिरवणूक नियोजन समितीच्या बैठकीला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक ही अनेक काळ रेंगाळते. याच पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ हा कमीत कमी कसा करता येईल, यावर चर्चा झाली.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















