Homeमहत्त्वाचेकल्याण गांजा तस्करी प्रकरणी आंतरराज्य रॅकेट उघड,१३ जण गजाआड

कल्याण गांजा तस्करी प्रकरणी आंतरराज्य रॅकेट उघड,१३ जण गजाआड

कल्याण परिमंडळ-३ पोलिसांची दमदार कामगिरी

गांजा तस्करी प्रकरणी आंतरराज्य रॅकेट उघड,१३ जण गजाआड

११५ किलो गांजासह पिस्तूल आणि साधनसामुग्री केली हस्तगत

कल्याण पोलीसांनी आंतरराज्य “गांजा” तस्करीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी कल्याणसह सोलापुर, विशाखापटणम् (आंध्रप्रदेश) या ठिकाणांवरून तब्बल १३ आरोपींना ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकी-टॉकी, मोटार कार, रिक्षा, दुचाकी वाहने अशा ७० लाखांहून अधिक मुद्देमालासह जेरबंद केले असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे. अंमली पदार्थाविरोधात कल्याण पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतच्या विविध मोठ्या कारवायांपैकी एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.

कल्याण आणि डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलरवर कारवाई करण्यासाठी परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी एका विशेष पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाने खडकपाडा पोलिसांच्या सहाय्याने २ ऑगस्ट २०२५ रोजी खडकपाडा पोलीस ठाणे हददीतील आंबिवली रेल्वे स्टेशन फाटकापुढे असलेल्या बनेली रोड परिसरातून गांजा तस्करीप्रकरणी ३ आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी तपास करत असताना पोलीसांना या गांजा तस्करीचे धागेदोरे कल्याण, बदलापूर, सोलापूर, ठाण्यासह आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपर्यंत असल्याची माहिती मिळाली.
त्यादृष्टीने आवश्यक ते पुरावे प्राप्त करून आणि प्राप्त पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त झेंडे यांच्या मार्गदशनाखाली विविध तपासपथक बदलापुर, ठाणे, सोलापुर जिल्हा, विशाखापट्ट‌णम राज्य आंध्रप्रदेश इत्यादी ठिकाणी पाठवुन या पथकांनी 13 आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहितीही अप्पर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी १) बाबर उरमान शेख, वय २७ वर्षे, २) गुफरान हनान शेख, वय २९ वर्षे, ३) सुनिल मोहन राठोड, यय २५ वर्षे, ४) आझाद अब्दुल शेख वय ५५ वर्षे, ५) रेश्मा अल्लावुददीन शेख वय ४४ वर्षे, ६) शुभम उर्फ सोन्या शरद भंडारी, वय २६ वर्षे, (७) सोनु हबीब सय्यद, वय २४ वर्षे, ८) आसिफ अहमद अब्दुल शेख, वय २५ वर्षे,९) प्रथमेश हरीदास नलवडे, वय २३ वर्षे, १०) रितेश पांडुरंग गायकवाड, वय २१ वर्षे,११) अंबादास नवनाथ खामकर, वय २५ वर्षे,१२) आकाश बाळु भिताडे, वय २८ वर्षे,१३) योगेश दत्तात्रय जोथ, वय ३४ वर्षे या आरोपींना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!