औरंगाबाद बुद्ध लेणी परिसरात ब्लास्ट केल्याने बुद्ध लेणीला हादरे बसले आणि थेट हादरा आमच्या काळजाला ही बसला.. बुद्ध लेणी धोक्यात! स्फोट केला, लेणीला हादरे..
#औरंगाबाद येथील प्राचीन बुद्ध लेणी परिसरात अवैध ब्लास्टिंग आणि खाणकाम सुरू होते.
छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आले असता, रामा हॉटेल येथे मी स्वतः त्यांना बुद्ध लेणीचे अस्तित्व व डोंगर वाचवण्यासाठी निवेदन दिले.
ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता व युवक अध्यक्ष म्हणून – बंटी दादा सदाशिवे, बुद्ध वारसा आणि डोंगर संरक्षणासाठी थेट मुख्यमंत्री समोर मागण्या मांडल्या आहेत.
या धक्कादायक प्रकारामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या बुद्ध लेणींना गंभीर धोका निर्माण झाला आहे.
उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली असून लेणी परिसराची पाहणी करण्यासाठी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे.
🔘 तहसीलदार परेश चौधरी आणि जिल्हाधिकारी स्वामी हे या प्रकाराला थेट जबाबदार आहेत. या संदर्भात जबाबदार असणाऱ्या परी चौधरी आणि जिल्हाधिकारी स्वामी यांचे निलंबन झालंच पाहिजे.
🔘 या अधिकाऱ्यांनीच आर्थिक उलाढाल करून लेणी परिसरात उत्खनन सुरू होऊ दिले आहे.
🔘 त्यामुळे त्यांना या गुन्ह्यात मुख्य आरोपी ठरवून तात्काळ अटक करावी.
🔘 त्यांच्या संपत्तीची चौकशी करून ती जप्त करावी.
▪️मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, पालकमंत्री यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी.
▪️हे बेकायदेशीर कृत्य होतं असताना शांत बसलेले आर्कियॉलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी काय करत होते? यांचीही चौकशी झाली पाहिजे.
▪️लेणीच्या आजूबाजूला उभारलेली बेकायदेशीर बांधकामे मनपा आयुक्तांनी तातडीने पाडावीत.
▪️ लेणी परिसरातील ५०० एकर जमीन सरकारच्या ताब्यात घेऊन येथे बुद्धिस्ट सर्किट हाऊस निर्माण करावे.
ऑल इंडिया पँथर सेना आता शांत बसणार नाही!
राज्यभर आंदोलन छेडणार, राज्य सरकारला इशारा देतोय –
बुद्ध लेणीवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.
आमच्या अस्मितेच्या प्रतीकावर डोळा ठेवणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाही.
बुद्ध लेणीचं सौंदर्य घालवण्याचा हा मनुवादी खोडसाळपणा आहे.
लेणीच्या अवघ्या १ किमी व ५०० मीटर अंतरावर सपाटीकरणाच्या नावाखाली विस्फोट घडवले गेले.
हा आमच्या काळजावर थेट केलेला हल्ला आहे.
हे वेदनादायी आहे. देशभरातील बौद्ध आता जागे होतील आणि लढतील. आमचं अस्तित्व म्हणजे आमची लेणी आहे. बुद्ध लेणीला काही झाल्यास सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील.
मुख्य आरोपींना अटक झालीच पाहिजे.
लवकरच पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करून मोर्चा आंदोलनाची व्यापक दिशा जाहीर कारणार! कोणत्याही प्रकारे हे प्रकरण दडपू देणार नाही. लेणीवर केलेल्या प्रत्येक हल्ल्याचा बदल घेणार म्हणजे घेणार!
दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना
#AllindiaPantherSena
अमोल बंटी सदाशिवे महाराष्ट्र प्रवक्ता, सचिन तिवारी महाराष्ट्र महासचिव, अविनाश हिवाळे युवा जिल्हा अध्यक्ष, कुणाल दांडगे शहर अध्यक्ष, संदीप गंगावणे जिल्हा उपाध्यक्ष सर्व औरंगाबाद जिल्हा शहर कमिटी
#SaveBuddhaCaves #ProtectHeritage #Aurangabad #ArrestTheCulprits
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde

मुख्य संपादक: संदीप जाधव





















