Homeताज्या बातम्यामोठी बातमी! उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईचे रस्ते खाली करा, हायकोर्टाचे...

मोठी बातमी! उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईचे रस्ते खाली करा, हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देश

Bombay High Court Order To Maratha Protestors : मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

 मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका बाहेरचा परिसर, चर्चेगट स्थानक, हुत्मात्मा चौक या परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी जमलेली बघायला मिळत आहे. दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी आंदोलक पोहोचले आहेत. आंदोलकांच्या गर्दीमुळे दक्षिण मुंबईतील रस्ते जाम झाले आहेत. यामुळे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने बराच वेळ युक्तिवाद पार पडल्यानंतर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आंदोलकांनी आझाद मैदान वगळता सर्व रस्ते मोकळे करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

हायकोर्टाने आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?

“प्रथमदर्शनी अंतरिम आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मनोज जरांगे पाटील, विरेंद्र पवार आणि अन्य प्रतिवादींनी प्रथमदर्शनी आंदोलनासाठी मिळालेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. तसेच त्यांना आझाद मैदानातील आंदोलनासाठी सध्या कोणतीही परवानगी नाही. त्यामुळे २६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अंतरिम आदेशाप्रमाणे आणि सार्वजनिक सभा, आंदोलने २०२५ अंतिम नियमावलीतील नियमांप्रमाणे सरकारने योग्य ती कार्यवाही करावी”, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

मुंबईतील जनजीवन सुरळीत होण्यासाठी आणि मुंबई ठप्प होऊ नये तसेच विशेषत: सध्याच्या गणेशोत्सवाबरोबर सर्व काळ आम्ही हे निर्देश आहोत. आंदोलकांनी रस्ते आणि सर्व संबंधित जागा आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता उद्या दुपारपर्यंत मोकळ्या कराव्यात. उद्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत आंदोलकांनी रस्ते मोकळे करावेत आणि आझाद मैदानातील विशिष्ट जागा वगळता मोगळ्या कराव्यात, असा महत्त्वाचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी खबरदारी घ्यावी की, आणखी येणारे आंदोलक मुंबईत येणार नाहीत”, असा मोठा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

“आम्ही राज्य सरकारला आदेश देतो की, जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तर त्यांना तात्काळ आवश्यक ते वैद्यकीय उपचार देण्यात यावेत”, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला. “आता या याचिका नियमित खंडपीठासमोर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणीसाठी ठेवण्यात येत आहेत”, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!