भाजप–शिवसेनेच्या अपयशाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठोस पर्याय पँथर
धुळे | प्रतिनिधी
धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ हा यावेळी शहरातील सर्वाधिक चर्चेचा आणि निर्णायक प्रभाग ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांत भाजप आणि शिवसेनेच्या सत्ताकाळात या प्रभागातील मूलभूत प्रश्न प्रलंबित राहिले. रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, गटारींची समस्या, अस्वच्छता आणि नागरिकांच्या तक्रारींकडे झालेले दुर्लक्ष यामुळे प्रभागातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.
भाजप–शिवसेनेने प्रभाग क्रमांक ८ मध्ये केवळ आश्वासनांची पेरणी केली; मात्र प्रत्यक्ष विकास कुठेही दिसून आला नाही. तथाकथित विकासाच्या गप्पांआड नागरिकांना खड्डे, पाणीकपात आणि भ्रष्ट कारभाराचा अनुभव सहन करावा लागला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) युतीने प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छ प्रतिमा, सक्षम आणि विश्वासार्ह उमेदवार उभे केले आहेत.
🔹 प्रभाग ८ (अ) : ऋषिकेश चंद्रकांत मोहिते (अनुक्रमांक ५) उर्फ सागर भाऊ
(ऑल इंडिया पँथर सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार युतीचे उमेदवार)
🔹 प्रभाग ८ (ब) : मालती अशोक धुळकर
🔹 प्रभाग ८ (ड) : अमोल नाना पाटील
हे तिन्ही उमेदवार प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत असून, “काम बोलेल, घोषणाबाजी नाही” या भूमिकेतून ते प्रचार करत आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, ७/१२ व मालमत्ता विषयक प्रश्न यावर ठोस आणि कालमर्यादित उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
“प्रभाग क्रमांक ८ ला मागे नेणाऱ्या भाजप–शिवसेनेच्या अपयशी राजकारणाला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे,”
असा ठाम निर्धार युतीचे उमेदवार ऋषिकेश चंद्रकांत मोहिते उर्फ सागर भाऊ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील मतदारांमध्ये बदलाची स्पष्ट लाट दिसून येत असून, येणारी निवडणूक ही केवळ उमेदवारांची नव्हे, तर विकास विरुद्ध अपयशाची लढाई ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
🔹 आमची ठोस आश्वासने 🔹
✅ भ्रष्टाचारमुक्त कारभार
प्रभागातील कोणतेही काम टक्केवारी, दलाली किंवा पक्षपातीपणाविना पारदर्शक पद्धतीने पूर्ण केले जाईल.
✅ दर्जेदार रस्ते व गटारी
खड्डेमुक्त, मजबूत रस्ते व कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था करून नागरिकांना दिलासा दिला जाईल.
✅ नियमित व शुद्ध पाणीपुरवठा
पाणीकपात बंद करून प्रत्येक घरापर्यंत नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.
✅ स्वच्छता व आरोग्य सुविधा
कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतेवर विशेष भर दिला जाईल.
✅ महिला व मुलांची सुरक्षा
महिलांसाठी सुरक्षित परिसर, लाईट व्यवस्था व त्वरित तक्रार निवारण यंत्रणा राबवली जाईल.
✅ ७/१२, मालमत्ता व नागरी प्रश्नांचे निवारण
नागरिकांचे प्रलंबित शासकीय प्रश्न महापालिकेत पाठपुरावा करून वेळेत सोडवले जातील.
✅ शासकीय योजनांचा थेट लाभ
गरजू नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मदत केंद्र सुरू केले जाईल.
✅ लोकांसाठी कायम खुले कार्यालय
आठवड्यातील ठराविक दिवशी नागरिकांसाठी खुले कार्यालय ठेवून थेट संवाद साधला जाईल.
✊ आमचा शब्द – आमची जबाबदारी
आम्ही निवडून आलो म्हणजे गायब होणार नाही,
तर तुमच्यातीलच एक सेवक म्हणून काम करणार आहोत.

मुख्य संपादक: संदीप जाधव




















