*दिव्यात परप्रांतीयाने केली तरुणाची हत्या; दिवा मनसे आक्रमक*
मनसे नेते श्री. राजुदादा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि दिवा शहर अध्यक्ष श्री.तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे दिवा शहर च्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची दिवा पोलिस चौकी येथे भेट घेतली.
यावेळी दिवा शहरातील वाढती गुन्हेगारी, शाळा कॉलेजच्या बाहेर मुलींची छेड काढणारे टवाळखोर, रात्री उशिरा पर्यंत सुरू राहणारे अमली पदार्थांची दुकाने, गर्दुल्यांचा असलेला वावर, बांगलादेशी आणि रोहिंग्यो फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ८ दिवसात यावर कारवाई न झाल्यास दिवा शहरात बंद पुकारण्याचा इशारा दिवा मनसेने दिला आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















