Homeमहत्त्वाचेदिवा स्टेशनहून सीएसएमटीकडे निघालेली सात महिन्यांची गर्भवती कुर्ला स्टेशनवर अडकली होती. नऊ...

दिवा स्टेशनहून सीएसएमटीकडे निघालेली सात महिन्यांची गर्भवती कुर्ला स्टेशनवर अडकली होती. नऊ तासांनंतर ती घरी पोहोचली.

सात महिन्यांच्या गर्भवतीचे नऊ तास प्रवासहाल, सात वर्षांच्या चिमुकल्यासह लोकलमध्ये अडकली; 9 तासांनी घरी कशी पोहोचली?

Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार पावसामुळे मंगळवारी रेल्वेसेवा तब्बल आठ तास ठप्प झाली होती. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. दिवा स्टेशनहून सीएसएमटीकडे निघालेली सात महिन्यांची गर्भवती कुर्ला स्टेशनवर अडकली होती. नऊ तासांनंतर ती घरी पोहोचली.

मुंबई : मंगळवारी सकाळपासून पाऊस कोसळत असला, तरी सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला तिच्या सात वर्षांच्या चिमुकल्याच्या दंतोपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रुग्णालय गाठणे गरजेचे होते. तिने दिवा स्थानकापासून सकाळी ९.४५ वाजता लोकलप्रवास सुरू केला. मजल-दरमजल करत ती कुर्ला स्थानकाच्या आधीपर्यंत पोहोचली आणि तिथे रेल्वेसेवा ठप्प झाली. पुन्हा दिवा स्थानकात परतेपर्यंत नऊ तास तिचे प्रवासहाल झाले.

सकाळी ९.११ वाजताची अर्धजलद लोकल डोंबिवली स्थानकावर नऊ वाजून ३० मिनिटांनी आली. मजल-दरमजल करत धीम्या मार्गावरून नाहुर स्थानकापर्यंत लोकल पोहोचली खरी, पण त्यानंतर तिचा वेग मंदावला. भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर या स्थानकांच्या रुळांवर काही भागांमध्ये पाणी साचले असल्यामुळे लोकल थांबत पुढे सरकत होती.

कुर्ला स्थानकाजवळ लोकल आल्यानंतर ती जवळपास सव्वा तास एकाच जागी थांबली. आपापल्या घरी, ऑफिसमध्ये प्रवासाचे तपशील देणे सुरू होते. बाजूला जलद मार्गावर एकामागे एक अशा तीन लोकल उभ्या होत्या. तेच चित्र धीम्या मार्गावरही होते. यातील एका गाडीत सात महिन्यांची गर्भवती असलेली ही महिलाही अडकली.

इतर लोकलमधील महिला प्रवाशांचेही हाल झाले. काही महिलाही पाण्याने भरलेल्या ट्रॅकमधून कुर्ला स्थानकाच्या दिशेने चालू लागल्या. त्यानंतर ट्रॅकमध्ये रेल्वे पोलिस येऊन ‘लोकलमधून उतरू नका, पाणी साचले आहे, लोकल लवकरच सुरू होईल’ असे सांगत होते. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे आणि कोणतीही ठोस सूचना मिळत नसल्याने प्रवाशांना काहीही करून कुर्ला स्थानक गाठायचेच असल्याने ते लोकलमधून उतरत होते.

काही वेळाने पोलिसांना माहिती विचारली असता त्यांच्याकडून शीव, माटुंगा आणि दादर भागात पाणी साचले असल्याने कदाचित मध्य रेल्वे बंद होईल, असे सांगण्यात आले. या भीतीने काही महिला प्रवासी गोंधळून गेल्या. अखेरीस चर्चा करून आपणही उतरू या असे ठरवत पोलिसांना तसे सांगितले. पोलिसांनी त्यांना सुखरूप उतरवले. कुर्ला स्थानकावर आल्यावर दुपारी एक वाजता ‘पुढील सूचना मिळेपर्यंत मध्य आणि हर्बर सेवा स्थगित करण्यात येत आहे’ ही उद्घोषणा झाली. त्यानंतर लोकल सुरू झाली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!