Homeताज्या बातम्यादिवा घराघरात पाणी, रस्त्यावर तलाव – नालेसफाईशिवाय दिवा बुडतोय!" रोहिदास मुंडे

दिवा घराघरात पाणी, रस्त्यावर तलाव – नालेसफाईशिवाय दिवा बुडतोय!” रोहिदास मुंडे

“घराघरात पाणी, रस्त्यावर तलाव – नालेसफाईशिवाय दिवा बुडतोय!” रोहिदास मुंडे

दिवा:- दिव्यात नालेसफाई झाली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. चाळी-चाळीत घरांमध्ये पाणी घुसले, रस्ते तुंबले, तर बेडेकर नगर, गणेश नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, डीजे कॉम्प्लेक्स, दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिकेने डोळेझाक केली. दरवर्षी प्रमाणे कोट्यवधी रुपयांचा निधी नालेसफाईसाठी मंजूर होतो, कंत्राटदारांना मोबदला मिळतो, पण प्रत्यक्षात नाले मात्र साफ होत नाहीत. यावर्षी तर फक्त नावालाच पहिला फेरा झाला आणि त्यानंतर सफाई थांबली. महापालिकेचा संपूर्ण कारभार भ्रष्टाचाराने पोखरलेला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी महापालिकेच्या या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष नालेसफाई करून महापालिकेची पोलखोल केली. नागरिकांसमोरच श्लोक नगर दातिवली नाळा, रिलायन्स टॉवर येथील नाळा,टाटा पॉवर लाईन रोड नाले दाखवत “महापालिकेचे दिंडवडे निघाले” अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.दिव्यातील नागरिक त्रस्त आहेत, महापालिका मात्र निद्रिस्त आहे! भ्रष्टाचार आणि ढिलाईचा हा खेळ तातडीने थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरून मोठा आंदोलन उभारेल, असा इशारा ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. नालेसफाईच्या दौऱ्या वेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील विभागप्रमुख योगेश निकम उपविभाग प्रमुख संदीप राऊत अशोक अमोडकर अमोल म्हात्रे
सचिन केसरकर आकाश विचारे
शैलेश कदम विलास मुलम रंजना देसाई तेजस ओपले पद्मा चव्हाण अनिता कनेरे शेखर पालशेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!