Homeताज्या बातम्याआंबेडकर जयंती शांततेत साजरी करा – दिवा पोलिसांचे आवाहन

आंबेडकर जयंती शांततेत साजरी करा – दिवा पोलिसांचे आवाहन

आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरात शांतता कमिटीची बैठक संपन्न; पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन

oplus_140509184

-दिवा: येत्या १४ एप्रिल रोजी साजरी होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिवा शहरात उत्साहात आणि शांततेत पार पडावी, यासाठी मुंब्रा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत दिवा शहरातील सर्व जयंती उत्सवाच्या मंडळांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उत्सवादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागू नये, या उद्देशाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे PI अमोल कोळेकर व अनिल सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान विविध उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सूचना मांडल्या, तसेच उत्सवाच्या नियोजनात येणाऱ्या संभाव्य अडचणी व समस्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या. पीआय अमोल कोळेकर यांनी या समस्या जाणून घेत, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याच्या सूचना सर्व मंडळांना दिल्या. शांतता आणि शिस्त पाळून महामानवाची जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.
या बैठकीला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक दीपक जाधव, समाजसेवक अमोल केंद्रे, दिनेश पाटील, सोपान जाधव, सुवर्णा कांबळे आणि उद्योजक बालाजी कदम यांच्यासह दिवा शहरातील अनेक मंडळांचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, यंदाची आंबेडकर जयंती दिब्यात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!