❗ अजित दादा… हे वागणं बरं नव्हे!
महाराष्ट्रातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न गेली ४–५ वर्षे गंभीर बनत चालला आहे. पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI, अमृत अशा संस्थांमार्फत अधिछात्रवृत्ती दिली जाते.
📌 पण वास्तव काय?
या फेलोशिपच्या जाहिरातींना नियमित वेळापत्रकच नाही. दरवर्षी जाहिरात येणं अपेक्षित असताना—
▪️ २०२२ नंतर बार्टीची
▪️ २०२३ नंतर सारथी, महाज्योती व इतर संस्थांची
एकही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
⏳ यामुळे हजारो संशोधक विद्यार्थ्यांचं शिक्षण, संशोधन आणि भवितव्य अडचणीत आलं आहे.
नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप मिळावी, समान धोरण रद्द व्हावं—या मूलभूत मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन, मोर्चे आणि निवेदने देत आहेत.
🚩 १२ डिसेंबर २०२५ | नागपूर
बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी एकत्र येत धडक मोर्चा काढला. मंत्रीमहोदय, लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि आमदार नितीन राऊत यांनीही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.
⚠️ मात्र, या सगळ्यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विधानं धक्कादायक आहेत.
ते म्हणतात 👉 “एकाच कुटुंबातील ५–६ लोक फक्त पैसे मिळतात म्हणून पीएच.डी. करतात.”
हे विधान केवळ अज्ञानाचं नाही, तर संशोधक विद्यार्थ्यांचा अपमान करणारे आहे.
याआधीही त्यांनी 👉 “पीएच.डी. करून हे काय दिवे लावणार?”
असं बेजबाबदार वक्तव्य केलं होतं.
❓ एक साधा प्रश्न आहे, अजित दादा…
तुमच्या कुटुंबातील सगळेच सदस्य राजकारणात असणं चालतं,
मग एकाच कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर ते चुकीचं कसं?
🔥 दलित-बहुजन विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी इतरत्र वळवणं आणि त्यांना शिक्षणापासून दूर ठेवणं—हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
उच्च शिक्षण व फेलोशिप हा दानधर्म नाही, तर संविधानिक अधिकार आहे.
✊ आम्ही आंबेडकरी विचारांचे विद्यार्थी व कार्यकर्ते म्हणून या विधानांचा जाहीर निषेध करतो.
विशेषतः बार्टीसारख्या संस्थेची इतर संस्थांशी तुलना करणेच चुकीचे आहे. सरकारचं तथाकथित “समान धोरण” हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे.
📢 जोपर्यंत हे धोरण रद्द होत नाही,
तोपर्यंत महाराष्ट्रातील दलित-बहुजन विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही.
🤝 म्हणूनच सर्व बहुजन नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांना नम्र आवाहन—
बार्टी वाचवण्यासाठी, पीएच.डी. संशोधन वाचवण्यासाठी एकत्र या.
हा लढा शिक्षणाचा, सामाजिक न्यायाचा आणि समतेचा आहे.
#PhDScholars #SaveBARTI #ResearchFellowship
#EducationalRights #SocialJustice #AmbedkariteMovement
#DalitBahujan #HigherEducation #AcademicJustice
#StudentProtest #EqualityInEducation #SupportPhDScholars #worship #worshipservice #temperature #SundayService #ReligiousEvent #religion #newmembers #community #retirement #christianity
#MarathiNews

मुख्य संपादक: संदीप जाधव





















