Homeराजकीयदिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दिवा शहरात नागरिकांची गॅस सिलेंडर साठी उघड लूट; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्यांना कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा” मेसेज पाठवला जात आहे. मात्र प्रत्यक्षात ८ ते १० दिवस सिलेंडर दिला जात नाही.
त्यानंतर डिलिव्हरी बॉय किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात आहे. हा प्रकार म्हणजे सरळसरळ नागरिकांची फसवणूक असून न दिलेले सिलेंडर काळाबाजारात विकले जात असल्याचा गंभीर संशय आहे.

सध्या देशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात असताना, दिवा शहरातील काही गॅस एजन्सी नागरिकांची उघडपणे लूट करत आहेत. अनेक कुटुंबांना ८-१० दिवस गॅस मिळत नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेषतः भारत गॅस कंपनीच्या काही एजन्सींबाबत या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत आहेत.

हा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहरातील नागरिकांच्या या प्रश्नावर ठामपणे उभी असून त्यांनी प्रशासनास खालील मागण्या केल्या आहेत.

१) संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी
२) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत
३) गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध करून द्यावे

काळाबाजार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी.

प्रशांत प्रभाकर गावडे
सचिव – दिवा शहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!