Shivsena MNS: मोठी उलधापालथ! राज ठाकरेंचा शिलेदार थेट श्रीकांत शिंदेसोबत; कल्याण-डोंबिवलीत भाजपवर कुरघोडी
MNS Raju Patil: कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौरपदावरून शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला शह दिला आहे. शिंदेंनी मनसेच्या पाच नगरसेवकांना आपल्यासोबत घेतल्याने शिवसेनेचं संख्याबळ वाढलं आहे.
महापालिकेत आजवर अडीच वर्षांचा काळ वगळता कायमच शिवसेनेने सत्ता ताब्यात ठेवली आहे. आताही शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असून शिवसेना उबाठा आणि शिवसेनेच्या जागा एकत्रित केल्यास बहुमताचा आकडा पार करत असल्याने शिंदेंची शिवसेना ही ठाकरेंच्या नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते अशी चर्चा आहे. मात्र खुल्या गटासाठी असलेले आरक्षण रद्द करून पुन्हा नव्याने आरक्षण जाहीर केले जाणार आहे. हे आरक्षण कोणासाठी फायद्याचे ठरणार याकडे नजरा आहेत. जर आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी कायम ठेवले गेले तर भाजपमधून राहुल दामले, दिपेश म्हात्रे, वरुण पाटील आणि महेश पाटील यांनी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेकडून रमेश म्हात्रे, विकास म्हात्रे, जयवंत भोईर, सचिन पोटे, महेश गायकवाड, माधुरी काळे हे इच्छुक आहेत. मात्र सध्या महायुतीत महापौर कोणाचा यावर कोणीही भाष्य करत नसून आरक्षण जाहीर झाल्यानंतर याबाबत चर्चा करणे योग्य राहील अशी भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव




















