Homeताज्या बातम्याMumbai Local Train : दिव्यातील प्रवाशांचा रोजचा प्रवास होणार सोपा; लवकरच Diva-Csmt...

Mumbai Local Train : दिव्यातील प्रवाशांचा रोजचा प्रवास होणार सोपा; लवकरच Diva-Csmt स्पेशल लोकल ट्रेन धावणार; पण कधी?

Diva to CSMT Local Train Service : दिवा ते सीएसएमटी दरम्यान थेट लोकल सेवा लवकरच सुरू होणार असून त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाणे : दिवा प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भविष्यात दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान थेट लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच बुलेट ट्रेनचे स्थानक दिव्यातील माथर्डी परिसरात होणार असल्याने दिवा शहराचा झपाट्याने कायापालट होत असल्याचा दावा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. रविवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिव्यात आयोजित सभेत ते बोलत होते.

दिवा-सीएसएमटी लोकल लवकर सुरू अन् बुलेट ट्रेन…

डॉ. शिंदे म्हणाले की,दहा वर्षांपूर्वी दिवा हे केवळ गावासारखे होते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि रेल्वे स्थानकाची अवस्था अतिशय खराब होती. मात्र आज दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढल्या आहेत.
दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने दर्जेदार शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात दिवा शहरात वैद्यकीय महाविद्यालयासारखे महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कल्याण रोड परिसरात टाटा कौशल्य विकास केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील सहा ते सात महिन्यांत हे केंद्र सुरू होणार आहे. यामुळे स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच दिवा शहरात उद्योजक घडवण्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोठे आणि हक्काचे घर विनामूल्य मिळणार
क्लस्टर पुनर्विकास योजनेबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, या योजनेअंतर्गत धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे, अधिकृत आणि मोठे घर विनामूल्य मिळणार आहे. ठाणे शहरात सध्या एकाचवेळी 13 क्लस्टर प्रकल्प सुरू असून दिवा शहरातील 95 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी स्पष्ट केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!