Homeताज्या बातम्याॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न

ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

ठाणे,दि.11,(जिमाका) :- ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत ठाणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत ठाणे शहर व ग्रामीण, नवीमुंबई, मिरा-भाईंदर या पोलीस विभागांच्या हद्दीत माहे जानेवारी 2025ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत खुन, बलात्कार, विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, जाळपोळ असे विविध प्रकाराचे एकूण 186 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी 102 अत्याचारित व्यक्तींना एकूण 42 लाख 50 हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात आले आहे. 84 प्रकरणांमध्ये कागदपत्रांच्या आभावामुळे अर्थसहाय्य देण्यात आलेले नाही.

कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणांत संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करुन सदर कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास उपलब्ध करुन द्यावेत. ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलीस विभागाने त्याबाबत तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण ठाणे व नागरी हक्क संरक्षण शाखा यांना अहवाल सादर करावा आणि पिडीत व्यक्तींचे जातीचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी पोलीस विभागाने संबंधित पिडीत व्यक्तींकडे पाठपुरावा करावा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाबाबत प्रचार प्रसार करुन विविध माध्यमांतून जनजागृती करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी हरिशचंद्र पाटील यांनी दिल्या.

या बैठकीस सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे, ठाणे ग्रामीण पोलीस उप अधिक्षक निलम वाव्हळ, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, प्र. माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!