Homeताज्या बातम्यालोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे', 'शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष' : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर...

लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे’, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’ : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर हल्लाबोल !

‎’लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे’, ‘शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’ : सुजात आंबेडकरांचा आरएसएस, सरकारवर हल्लाबोल !

‎नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरएसएस आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपूर दौऱ्यावर होते.

‎सुजात आंबेडकर म्हणाले की, “जोपर्यंत RSS संविधानाच्या चौकटीत येत नाही, भारताचे संविधान मान्य करत नाही, स्वतःची नोंदणी करत नाही आणि तिरंगा फडकवत नाही, तोपर्यंत आमची आरएसएस विरोधातील लढाई सुरूच राहील.”

‎राज्यातील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश सर्वत्र दिसत आहे. सरकारने त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे,” अशी टीका त्यांनी केली.

‎देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत सुजात आंबेडकर म्हणाले, “आज उघडपणे लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे. भाजप लोकशाही संपवून स्वतःची मक्तेदारी निर्माण करत आहे.” यासोबतच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही उद्देशून प्रश्न उपस्थित केला — “उच्च पदस्थ नोकरशाह म्हणून तुम्ही यावर कारवाई करणार आहात की नाही?”

‎निवडणूक आयोगावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. २ डिसेंबरला होणारी निवडणूक पुढे ढकलून २० डिसेंबरला नेण्यात आली, यामागेही राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. “तडकाफडकी निवडणुका पुढे-मागे करणे, एकत्र घेणे किंवा उशिरा जाहीर करणे — हे सामान्य उमेदवारांनी निवडणूक लढवूच नये किंवा उभे राहिले तरी पराभूत व्हावेत, अशा प्रकारची यंत्रणा भाजप उभी करत आहे,” असे ते म्हणाले.

‎निवडणुका या सहज राहिलेल्या नाहीत. पैसा, ताकत असलेले लोकचं सत्तेत जातील आणि जे सत्तेबाहेर आहेत ते कायमच सत्तेबाहेर राहतील, यासाठी भाजपाने व्यवस्था निर्माण केली आहे.

‎प्रेस क्लब, महाराजबाग रोड येथे पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

#DemocracyUnderThreat
#FarmersIssues
#RSSControversy
#PoliticalAttack
#SujatAmbedkar
#VBAPressConference
#MaharashtraPolitics
#ElectionCommission
#ElectionManipulation
#FarmersCompensation
#NagpurNews
#IndianPolitics

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

error: Content is protected !!